कोंढव्यात दुचाकी घसरून
महिलेचा मृत्यू; पती जखमी

कोंढव्यात दुचाकी घसरून महिलेचा मृत्यू; पती जखमी

Published on

पुणे, ता. १७ : भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार पती जखमी झाला आहे. ही घटना कोंढव्यातील टिळेकरनगर परिसरात घडली.

पुनितादेवी विजयकुमार सिंग (वय ४६, रा. व्यंकटेश गॅलॅक्सी अपार्टमेंट, कामठे पाटीलनगर, कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या अपघातात विजयकुमार शिवमंगल सिंग (वय ५३) हे जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिस अंमलदार बिपिन सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली. त्यावरून पती विजयकुमार यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार पत्नी पुनितादेवीसमवेत मंगळवारी (ता. १२) दुचाकीवरून टिळेकरनगर परिसरातून जात होते. त्यावेळी अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी घसरली. त्यामुळे दुचाकीस्वार विजयकुमार आणि मागील सीटवर बसलेल्या पुनितादेवी दोघे खाली पडले. या अपघातात पुनितादेवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी दोघांना ससून रुग्णालयात केले, परंतु उपचारादरम्यान पुनितादेवी यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पूजा पाटील करीत आहेत.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com