‘ईझीचेक’ला माशेलकर फाउंडेशनचा पुरस्कार

‘ईझीचेक’ला माशेलकर फाउंडेशनचा पुरस्कार

Published on

पुणे, ता. १९ : पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे घेण्यात आलेल्या १२व्या राष्ट्रीय परिषदेत सुई न टोचता अॅनिमियाचे निदान करणाऱ्या ‘ईझीचेक’ या उपकरणास अंजनी माशेलकर फाउंडेशनचा ‘इन्क्ल्युझिव्ह इनोव्हेशन’चा पुरस्कार देण्यात आला. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांच्या हस्ते ‘इव्हीआयएक्स हेल्थ टेक’चे संस्थापक पार्थ प्रतीमदास महापात्रा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन्‍मानचिन्‍ह व एक लाख रुपये रोख असे या पुरस्‍काराचे स्‍वरूप आहे. यावेळी फाउंडेशनचे प्रमुख व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थित होते.
इव्हीआयएक्स कंपनीद्वारे ‘इझीचेक’द्वारे सुई टोचून रक्त न घेता केवळ स्कॅनिंग करून हिमोग्लोबीन मोजता येते, त्यामुळे अॅनिमियाचे निदान तातडीने करणे शक्य होते. ग्रामीण भागातील कमी प्रशिक्षित व्यक्तींनादेखील हे उपकरण सहजपणे वापरता येऊ शकेल. ‘इझीचेक’ला एक मोबाईल अॅप जोडलेले असून हिमोग्लोबिनचे निदान आणि मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यासाठी अत्‍याधुनिक सुविधादेखील उपलब्ध आहे. अॅनिमियामुळे गर्भवती मातांसाठी गंभीर समस्या निर्माण होते, तसेच मुलांचे शारीरिक व बौद्धिक नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी ‘इझीचेक’ उपयुक्‍त ठरेल. माशेलकर फाउंडेशनने आजपर्यंत अशा १५ क्रांतिकारक नवकल्पनांचा सन्मान केला आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ व विचारवंत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी त्यांच्या मातोश्री अंजनी माशेलकर यांच्या गरीबांसाठी विज्ञानाचा उपयोग करण्याच्या इच्छापूर्तीच्या उद्देशाने ही संस्था स्थापन केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com