पहिल्या दिवशी दर्जेदार एकांकिकांचे सादरीकरण
पुणे, ता. १९ : ‘सकाळ करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या पुणे विभागीय अंतिम फेरीला मंगळवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशीच चार दर्जेदार एकांकिकांचे सादरीकरण झाले. महिलांवरील वाढते अत्याचार, हवाई दलातील माणसांची कहाणी, मैत्रीची भावस्पर्शी कथा अशा वेगवेगळ्या विषयांची हाताळणी या एकांकिकांमधून करण्यात आली.
१) इंडसर्च इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज :
एकांकिका : ‘स्टेटस को’
लेखक : अथर्व गोडबोले, नीरजा भिडे
दिग्दर्शक : नीरजा भिडे
कलाकार व तंत्रज्ञ : अथर्व गोडबोले, नीरजा भिडे, प्रज्ञा सूर्यवंशी, आर्य जमेनीस, नताशा रामपुरे, सृष्टी वाळंज, श्रीधर माळी, रुद्र जोगळेकर, ओम परांजपे
एकांकिकेचा सारांश : ‘सॅम’ नावाच्या एका तरुणाची ही गोष्ट. त्याला तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःच्या मरणाची वेळ आधीच कळते. मात्र हे कळल्यानंतर तो स्वतःभोवती कोष निर्माण करतो. ईशा नावाची मैत्रीण त्याला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते; मात्र तोवर वेळ निघून गेलेली असते.
२) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करियर कोर्सेस’ (आयएमसीसी) :
एकांकिका : ‘सखा’
लेखक : ओम चव्हाण
दिग्दर्शक : ओम चव्हाण
कलाकार व तंत्रज्ञ : उत्कर्ष दुधाणे, ओम चव्हाण, समृद्धी पाटणकर, आकाश तुपे, तृप्ती येवले, मयूर पुरोहित, आयुष साळी, पुष्कर ढगे, तन्मय सूर्यवंशी, शंतनू माने, राज सोनावणे, मैथिली निकम, दुर्गेश खिरे, आयुष खानापुरे, संजना गायकवाड, कशिश पाटील, कौशल वाणी, प्रज्योत सोमवंशी, पूजा नायक
एकांकिकेचा सारांश : कृष्ण आणि सुदामा यांच्या गोष्टीच्या आधारे मैत्रीची हळवी बाजू उलगडणारी ही एकांकिका. १९४० च्या दशकात दोन मित्र चित्रपट करण्याचा प्रयत्न करत असतात. हा चित्रपट करत असताना येणाऱ्या अडचणी, त्यातून होणारे वाद आणि सरतेशेवटी चित्रपटामुळेच या दोन मित्रांमध्ये पुन्हा घट्ट होणारे भावबंध, अशी कथा यात मांडण्यात आली आहे.
३) डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे विद्यापीठ :
एकांकिका : ‘कॉकपिट’
लेखक : शार्दूल असवडेकर, कृष्णा अनाप
दिग्दर्शक : शार्दूल असवडेकर
कलाकार व तंत्रज्ञ : नीरज जोशी, तनय मिठारी, किरण मोहिते, रुद्र कुलकर्णी, श्रेयस तनपुरे, प्रांजल पंचोली, मिष्टी कुचेरिया, रिद्धी कुलकर्णी, शार्दूल असवडेकर, माधव अग्रवाल
एकांकिकेचा सारांश : भारतीय हवाई दलातून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याची कथा या एकांकिकेतून मांडण्यात आली आहे. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात असलेला हा अधिकारी आणि एक अगदी १०-१२ वर्षांचा लहान मुलगा, यांचा आयुष्याकडे पाहण्याचा भिन्न दृष्टिकोन यात उलगडण्यात आला आहे.
४) शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, बारामती :
एकांकिका : ‘एका अंताची सुरुवात’
लेखक : दिनेश मोरे
दिग्दर्शक : साक्षी चव्हाण
कलाकार व तंत्रज्ञ : दिव्या तावरे, साक्षी चव्हाण, अंकिता जाधव, नेहा धायगुडे, काजल भोये, सानिका काळे, ऋतुजा भुजबळ, श्रावणी विभूते, साक्षी सोनवलकर, नेहा कदम, नेहा शिंदे, अपूर्वा साबळे, आर्या काळे, श्रेया गव्हाणे, आसमा शेख, संजना जाधव
एकांकिकेचा सारांश : अलीकडच्या काळात वाढत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या समस्येची दाहकता मांडण्याचा प्रयत्न या एकांकिकेतून करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी मुलींना स्वरसंक्षणाचे धडे देणे, पुरुषांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करणे, कसे गरजेचे आहे, यावर यात भाष्य करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
