माजी नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला

माजी नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला

Published on

पुणे/विश्रांतवाडी, ता. १९ : विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवशी मंगळवारी (ता. १९) शहरातील धानोरी परिसरात अज्ञात व्यक्तींनी एका माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला केला. तसेच, पर्वती मतदारसंघातील इंदिरानगर भागात पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून कार्यकर्त्यांमध्ये आपसांत वादावादीचा प्रकार घडला.
निवडणुकीचा प्रचार सोमवारी सायंकाळी थंडावला. परंतु, मंगळवारी काही ठिकाणी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीच्या घटना घडल्या. धानोरी येथील माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात चंद्रकांत टिंगरे जखमी झाले आहेत. त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.
चंद्रकांत टिंगरे मंगळवारी दुपारी धानोरीतील कार्यक्रम आटोपून मोटारीतून घरी निघाले होते. अग्निशामक दलाच्या केंद्राजवळ दुचाकीवरून चार हल्लेखोर त्यांच्या मोटारीजवळ आले. त्यांनी टिंगरे यांच्या मोटारीवर दगड आणि विटा फेकल्या. यामध्ये टिंगरे यांच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘‘या संदर्भात प्रत्यक्षदर्शीचा जबाब नोंदविण्यात आला आहे. विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे,’’ अशी माहिती पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली. दरम्यान, आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार वंदना चव्हाण, अंकुश काकडे, अरविंद शिंदे, रेखा टिंगरे आदींनी पोलिस आयुक्त यांच्याकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com