स्कूलिंपिक फुटबॉल मुले

स्कूलिंपिक फुटबॉल मुले

Published on

पवार पब्लिक स्कूलचा आठ गोलांचा पाऊस
सिंहगड स्प्रींगडेलचाही पाच गोलांसह दणदणीत विजय
पुणे, ता. १९ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्समधील फुटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात हिंजवडीच्या पवार पब्लिक स्कूलने तब्बल आठ गोलांचा पाऊस पाडला. बावधनच्या सूर्यदत्ता नॅशनलविरुद्ध या संघाने ही कामगिरी केली.
पाषाणमधील एनसीएल मैदानावर पवार पब्लिक स्कूलने दोन्ही सत्रांत प्रत्येकी चार गोल केले. अन्य एका सामन्यात सिंहगड स्प्रींगडेल संघानेही दणदणीत विजय नोंदविला. त्यांनी भोसरीच्या मास्टरमाईंड ग्लोबलविरुद्ध पाच गोल नोंदविले. अथर्व पाटील आणि ऋषभ राणे यांनी प्रत्येकी दोन गोल केले. संघाच्या विजयात नील उमराणी यानेही उपयुक्त योगदान दिले. संघाच्या दोन गोलांमध्ये त्याचे पास निर्णायक ठरले.
निकाल
पवार पब्लिक स्कूल, हिंजवडी ः ८ (शेन ६वा मिनिट, २६, श्रीराम ८, ३४, आदित्य झा ९, सोहम जांबळे १७, संभाजी ३०, आदम्य ३२) विवि सूर्यदत्ता नॅशनल, बावधन ः ०. सिंहगड स्प्रींगडेल, आंबेगाव बुद्रूक ः ५ (अथर्व पाटील ४, १७, ऋषभ राणे १०, १९, संकल्प बनकर २५) विजयी विरुद्ध मास्टरमाईंड ग्लोबल इंग्लिश, भोसरी ः ०. ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलन्स, खराडी ः २ (सक्षम निचत २८, ४०) विवि सेंट मॅथ्यूज अॅकॅडमी, उरुळीकांचन ः ०. श्री चैतन्य टेक्नो स्कूल, वाघोली ः १ (आरुष बिश्वास १) विवि डॅफोडील इंटरनॅशनल, बालेवाडी ः ०. रसिकलाल एम. धारिवाल इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड ः २ (अथर्व दुब्बेवार ८, ११) विवि सीइएस विलू पुनावाला इंग्लिश, कॅम्प ः ०. संस्कार प्रायमरी, दौंड पुढे चाल विरुद्ध विबग्योर, बालेवाडी. आदित्य इंग्लिश, बाणेर ः २ (अलोक शिवशरण १२, रितेश बिजर्नीया ३९) विवि विश्वभारती इंग्लिश, धायरी ः ०. लोकसेवा, पाषाण ३ (आयुष मेणेकारे १, ऋग्वेद रेगे ३, ध्रुव कामत २९) विवि श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलीटरी स्कूल, शिवाजीनगर १ (सार्थक पवार ३९).
-----­­

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com