अत्याचार करणाऱ्याला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अत्याचार करणाऱ्याला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
Published on

पुणे, ता. २९ : अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्याला न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. वडगाव मावळ न्यायालयाचे विशेष (पोक्सो) न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी हा निकाल दिला.
बिसोवजित मोनीलाल देबनाथ (वय २१) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत तेरावर्षीय मुलीच्या आर्इने फिर्याद दिली होती. त्यानुसार तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एप्रिल ते जुलै २०१९ दरम्यान हा प्रकार घडला होता.
बिसोवजितने ओळखीचा फायदा घेत मुलीशी जवळीक साधली. त्यानंतर वारंवार तिच्यावर अत्याचार केला. त्यातून मुलगी गर्भवती राहिली होती. मुलीला डॉक्टरकडे नेल्यानंतर मुलगी गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. आईने विश्‍वासात घेऊन विचारले असता, तिने सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीचा गर्भपात करण्यात आला आहे. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील स्मिता चौगले यांनी पाहिले. त्यांनी फिर्यादी, मुलगी व इतर आठ साक्षीदार यांची साक्ष घेऊन पुरावे सादर केले. आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केले आहे. त्यामुळे त्याला सहानुभूती दाखविली जाऊ नये, असा युक्तिवाद ॲड. चौगले यांनी केला. सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि साक्षी पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली. तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. जे. नागरगोजे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप रायनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार अविनाश गोरे यांनी या खटल्यामध्ये वडगाव मावळ न्यायालयात पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com