

पुणे, ता. ३ ः जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्ह्यात मंगळवार (ता. १०) डिसेंबरपर्यंत जागतिक शौचालय दिन मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘शौचालये सुशोभित करा, जीवन आनंदी बनवा’ हे या मोहिमेचे घोषवाक्य असणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
या मोहिमेअंतर्गत ‘आमचे शौचालय आमचा सन्मान’ स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामपंचायत अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती, स्वच्छता, वापर आणि रंगरंगोटी करणारे कुटुंबप्रमुख आणि सार्वजनिक शौचालयासाठी सरपंच, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. जिल्ह्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक नादुरूस्त शौचालये वापरात आणणे, त्याची दुरुस्ती, सुशोभीकरण यासारखे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयाची निवड त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.