

मध्यस्थींनी पुरोगामी राज्याला
सुसंगत अशी भूमिका घ्यावी
न्यायमुर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन
पुणे, ता. २ ः महाराष्ट्र ही संत, महापुरुषांची भूमी आहे. या भूमीला समाजसुधारकांचा वारसा लाभला आहे. न्यायपालिकेत पुरोगामी राज्याला सुसंगत अशी भूमिका मध्यस्थींनी घ्यावी. न्यायानंतर संबंधित व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद व समाधानाची भावना दिसावी यादृष्टीने काम करावे,’’ असे आग्रही प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे (नालसा) कार्याध्यक्ष भूषण गवई यांनी केले.
एकदिवसीय विभागीय मध्यस्थी परिषदेच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती प्रसन्न वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाचे कार्याध्यक्ष अतुल चांदुरकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती रेवती मोहिते-ढेरे, रवींद्र घुगे, नितीन सांभरे, भारती डांगरे, अमित बोरकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे (मुंबई) सदस्य सचिव समीर आडकर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील या वेळी उपस्थित होते.
न्यायमुर्ती गवई म्हणाले, ‘‘मध्यस्थींनी दोन व्यक्ती, संस्थामधील मतभेद दूर करून समान न्यायाच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. न्यायपालिकेत व्यक्तींना न्याय देताना तो कमी वेळेत व कमी खर्चात चांगल्यारीतीने न्याय देण्यावर भर दिला पाहिजे. हे उद्दिष्ट साध्य करण्यावर सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारत मध्यस्थीची महत्त्वाची भूमिका पार पाडावी. राज्यात मध्यस्थीची सुरू असलेली चळवळ यशस्वी करण्याकरिता प्रयत्न करावेत. त्यासाठी तुमच्या अंगी इच्छा, तळमळ असावी लागते.’’
न्यायमुर्ती वराळे म्हणाले, ‘‘पुणे ही संताची शिकवण लाभलेली भूमी आहे. समाजातील विषमता दूर करून समता प्रस्थापित करण्यासोबतच वंचितांना न्याय देण्याच्या संतांची शिकवणीप्रमाणेच आपल्या संविधानाचे तत्त्व आहे. यादृष्टीने समाजातील वंचितांना न्याय देण्यासोबतच विषमता दूर करण्याकरिता प्रयत्न करावे.’’
या वेळी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाचे (मालसा) मराठी भाषेतील उद््घोष गीत, मध्यस्थी हस्तपुस्तिका तसेच विधी सेवा पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. त्याच बरोबर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या समाजमाध्यमांचे ई-लोकार्पण करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.