

प्रात्यक्षिकाद्वारे शिका व्यावसायिक मसाले
पुणे, ता. ३ ः गरम मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, मटण मसाला, चाट मसाला, मिसळ मसाला, चहा मसाला, गोडा मसाला, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, काळा मसाला इ. घरगुती चवीचे, झणझणीत कोल्हापुरी मसाले कसे तयार करावे याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे दोन दिवसीय प्रशिक्षण येत्या शनिवारी (ता. ७) व रविवारी (ता. ८) आयोजिले आहे. यात व्यावसायिक दृष्टीने मसाले कसे तयार करावे, मसाला व्यवसायाची सुरुवात कशी करावी, पॅकेजिंग, लेबलिंग, मार्केटिंग कसे करावे याबाबत मार्गदर्शन होणार आहे. कार्यशाळा पूर्ण केल्यास सर्व मसाला रेसीपींच्या पीडीएफ नोट्सही पुरवल्या जातील.
संपर्क : ८४८४८११५४४
लॅण्डस्केप डिझायनिंग प्रशिक्षण
लॅण्डस्केप नियोजन व डिझायनिंग यात करिअरला भरपूर वाव आहे. हे लक्षात घेता सकाळ ‘एसआयआयएलसी’ आणि ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी (एआयएसएसएमएस) यांच्या वतीने लॅण्डस्केप डिझायनिंग हा ८० तासांचा ऑनलाइन व ऑफलाइन अभ्यासक्रम १४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या अभ्यासक्रमाची रचना विद्यार्थी तसेच नोकरी करणारा वर्ग डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आली आहे. लेखीबरोबरच प्रात्यक्षिक अनुभवासाठी विविध रचनेच्या उद्यानांना, साइट प्रकल्प, क्षेत्र भेट आयोजन असणार आहे. अभ्यासक्रमामध्ये झाडे, झुडुपे, वेलींच्या लॅण्डस्केपिंगसाठी शास्त्रीयदृष्ट्या वापर, रस्ते, उद्याने, मोकळ्या जागेत लॅण्डस्केपचे नियोजन, लॅण्डस्केपसाठी बांधकाम रचना, नियोजन, प्रकल्प नियोजन व लॅण्डस्केप प्रकल्प डिझायनिंग, लॅण्डस्केपिंगसाठी अंदाजे खर्चाचे नियोजन, ऑटोकॅड सॉफ्टवेअर, पर्यावरण आणि कायदेविषयक बाबींचा समावेश आहे. अभ्यासक्रमासाठी बारावी उत्तीर्ण, कुठल्याही शाखेचा पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार, गृहिणी प्रवेश घेऊ शकतात.
संपर्क : ९८८१०९९४२६
मेडिकल कोडिंग प्रमाणपत्र प्रशिक्षण
वैद्यकीय क्षेत्रात करिअरसाठी मेडिकल कोडिंग हे तीन महिन्यांचे प्रमाणपत्र प्रशिक्षण एसआयआयएलसी व टेक महिंद्रा यांच्यावतीने १५ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यामध्ये सीपीसी (सर्टिफाइड प्रोफेशनल कोडर) प्रमाणपत्र तयारीचे मार्गदर्शन तसेच केपीओ (नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग) व बीपीओसाठीचे (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) मार्गदर्शन होणार आहे. मेडिकल शब्दावलीची ओळख, मेडिकल सेवा भाषेची समज, शरीर विज्ञान आणि शारीरिक रचना, कोडिंग प्रणाली : आयसीडी-१०, सीपीटी आणि एचसीपीसीएस कोडिंग, वैद्यकीय सेवा नियमावली (एचआयपीएए), कोडिंग नियम व मार्गदर्शक तत्त्वे, कोडिंग सराव इ. चा समावेश आहे. सायन्स विषयातील २१ ते २५ वयोगटातील पदवीधारक, व्यावसायिक, मेडिकल कोडिंगमध्ये करिअर करू इच्छिणारे प्रवेशास पात्र आहेत.
संपर्क : ८४८४८११५४४
नगररचना, मूल्यनिर्धारण भरतीपूर्व तयारी प्रशिक्षण
कनिष्ठ आरेखक, अनुरेखक या पदांच्या भरतीसाठीच्या पूर्वतयारीचे प्रशिक्षण १५ डिसेंबरपासून सुरू होत आहे. परीक्षेची पूर्वतयारी, तांत्रिक अभ्यासक्रम याबाबत मार्गदर्शन करणारे हे १५ दिवसांचे प्रशिक्षण असणार आहे. एमआयडीसी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, इतर स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, जलसंपदा विभाग, म्हाडा, भूमी अभिलेख अशा विविध विभागांमध्ये स्थापत्य अभियंता सहायक, बांधकाम पर्यवेक्षक, सर्वेअर, अनुरेखक, आरेखक इत्यादी पदांसाठी होणाऱ्या भरती परीक्षांसाठी सदर प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. विविध कन्स्ट्रक्शन सुपरवायझरच्या तसेच ड्राफ्ट्समन सिव्हिल व मेसन आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठीदेखील हे प्रशिक्षण गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.