प्रॉपर्टी कार्डावरील दुरुस्तीच्या नोंदीसाठी वेळ कमी लागणार

प्रॉपर्टी कार्डावरील दुरुस्तीच्या
नोंदीसाठी वेळ कमी लागणार
Published on

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३ : भूमी अभिलेख विभागाने प्रॉपर्टी कार्ड टपाल विभागाच्या संगणकप्रणालीशी लिंक केल्याने त्यावरील ई-दुरुस्तीच्या नोटिसा आॉनलाइन स्पीड पोस्टाद्वारे पाठविण्यात येतील. राज्यात पहिल्या टप्प्यात पुणे शहरात हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे प्रॉपर्टी कार्डावरील वारस नोंद, खरेदी-विक्रीच्या नोंदी घेण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल. त्याशिवाय यासाठी नागरीकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
नगर भूमापन कार्यालय क्रमांक १ आणि २ येथे हा प्रयोग सुरु करण्यात आला. यापुढे शहराच्या हद्दीत प्रॉपर्टी कार्डवर वारसनोंदी अथवा खरेदी-विक्री नोंदीत दुरुस्ती फेरफार करायची असल्यास कार्डावर नावे असलेल्या संबंधित व्यक्तींना पोस्टाद्वारे नोटिसा पाठविल्या जातील. ऑनलाइन प्रणालीमुळे नोटीस प्रत्यक्ष तयार करून ती पोस्टात पाठविण्यात लागणारा वेळ, संबंधिताला नोटीस मिळाली की नाही याचेही ट्रॅकींग करणे सोईचे होईल.
भूमी अभिलेख विभागाचा विविध सेवा ऑनलाइन देण्यावर भर आहे. अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सातबारा उताऱ्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले आहे. अशा शहरांतील मिळकतीचा व्यवहार झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने प्रॉपर्टी कार्डावर नोंद घेण्यासाठी दस्तनोंदणीची प्रत जोडून अर्ज करावा लागत होता. त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात जावे लागत होते. त्यामध्ये नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होत होता. नोंदीसाठी चकरा माराव्या लागत होत्या. या पार्श्‍वभूमीवर भूमि अभिलेख विभागाने ‘एनआयसी’च्या मदतीने ही संगणकप्रणाली विकसित केली आहे.
---------------
पुढील टप्प्यात प्रॉपर्टी कार्डावरील मिळकतीची खरेदी-विक्री अथवा वारसनोंदीसाठी अर्ज आल्यानंतर त्याची नोंद घेऊन ई-दुरुस्ती होईल. त्यानंतर नमुना ९ नोटीस आॉनलाइन पद्धतीने ई-पोस्टला जाईल. टपाल कार्यालयात त्याची प्रिंट काढून ती संबंधित व्यक्तीला स्पीड पोस्टने पाठविली जाईल. या कामासाठी मनुष्यबळ लागायचे. त्यातही बचत होणार आहे. संबंधित व्यक्तीला नोटीस मिळाली की नाही, ती त्यांनी स्वीकारली की नाही, पत्ता चुकीचा दिला होता का याचीही माहिती विभागाला मिळणार आहे. त्यामुळे याचे रेकॉर्ड ठेवणे शक्य होईल.
- निरंजन सुधांशू, जमाबंदी आयुक्त
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com