विविध साहित्यातून मी घडत गेलो : डॉ. गाडगीळ
पुणे, ता. ७ : ‘‘ग्रंथसंपदा लहानपणापासूनच माझ्यासमोर होती. साहित्य, निसर्ग, पर्यावरण अशा प्रकारच्या विविध साहित्याचा आस्वाद मला घेता आला आणि त्यातून मी घडत गेलो. ‘सह्याचला आणि मी एक प्रेमकहाणी’ या पुस्तकात मी माझ्या आठ दशकांचा अनुभव लिहायचा प्रयत्न केला आहे. जी पुस्तके मला हवी होती त्याचा शोध पुणे मराठी ग्रंथालयात पूर्ण झाला,’’ असा अनुभव ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी मांडला.
पुणे मराठी ग्रंथालयाच्या दिवंगत ना. ह. आपटे व दिवंगत ना. के. बेहेरे यांच्या स्मरणार्थ पुस्तक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. गाडगीळ यांना ‘सह्याचला आणि मी एक प्रेमकहाणी’ या पुस्तकासाठी दिवंगत ना. ह. आपटे यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देण्यात आला. तर डॉ. केसकर यांना ‘लेफ्ट. कर्नल पुरोहित विश्वासघाताचा बळी?’ या पुस्तकासाठी दिवंगत ना. के. बेहेरे यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश प्रधान, ग्रंथालयाचे अध्यक्ष धनंजय बर्वे, सीमा शेवाळे, ज्येष्ठ अनुवादक व लेखिका डॉ. अनया केसकर आणि श्रीमंत देव यावेळी उपस्थित होते.
डॉ. केसकर म्हणाल्या, ‘‘पुरोहित यांच्यावर असलेल्या पुस्तकाच्या भाषांतराचे काम जोखमीचे होते. पुरोहित यांच्यावर झालेले आरोप खोडून काढण्यासाठी हे पुस्तक मराठीत येणे आवश्यक होते.’’
प्रधान म्हणले, ‘‘आपल्याकडे पर्यावरण संवर्धनाचे फक्त कार्यक्रम सुरू आहेत. मात्र पर्यावरणाचा दृष्टिकोन आपल्यामध्ये रुजलेला नाही. जे उपक्रम राबविले जातात ते केवळ चार दिवसांसाठी असतात. पर्यटन म्हणजे केवळ समुद्र किनारपट्टीवर जाऊन दारू पिणे नाही. मात्र सध्या सर्वत्र हेच सुरू आहे, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

