जातीच्या दाखल्यासाठी
अंमलबजावणीची मागणी

जातीच्या दाखल्यासाठी अंमलबजावणीची मागणी

Published on

पुणे, ता. ७ : समता बेलदार समाज संस्था व सकल बेलदार समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे बेलदार समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जातीच्या दाखल्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना भेटून निवेदन दिले.
बेलदार समाज हा महाराष्ट्रामध्ये ‘एनटी’ व केंद्र सरकारमध्ये ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आला आहे. हे दोन्ही दाखले मिळवण्यासाठी काही कागदपत्रे पुराव्यासाठी सादर करावी लागतात. मूळ पुराव्याअभावी अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे मुलांना शालेय शिक्षण सोडावे लागत आहे तर अनेकांची या मुळे नोकरी गेली आहे, अशी बाजू मांडली. जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी जातीच्या दाखल्यासाठीची अंमलबजावणी लवकरात लवकर होईल, असे आश्वासन दिले. मागणी पूर्ण न झाल्‍यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनांतर्फे देण्यात आला. यावेळी समता बेलदार समाज संस्थेचे अध्यक्ष व सकल बेलदार समाज संघटना युवा मोर्चा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर विशाल साळुंखे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com