हिरकणी कक्ष उभारणे बंधनकारक
पुणे, ता. ७ ः सार्वजनिक, निम सार्वजनिक, संस्थात्मक, शैक्षणिक अशा संस्थांमध्ये ज्या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात काम करतात. अशा इमारतींमध्ये स्तनदा माता, गरोदर महिला व सहा वर्षाखालील मुले असलेल्या माता यांच्याकरिता हिरकणी कक्ष उभारणे राज्य सरकारकडून बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या सहसचिव डॉ. प्रतिभा भदाने यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये (युडीसीपीआर) नव्याने ही तरतूद समाविष्ट करण्यात आली आहे.
सार्वजनिक, निम सार्वजनिक अशा इमारतींमध्ये महिला कक्ष नसल्यामुळे महिलांना अडचणी निर्माण होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. तसेच महिला व बाल विकास विभागाने सुद्धा हिरकणी कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर नगर विकास विभागाने सार्वजनिक, संस्थात्मक अशा इमारतीमध्ये महिला कक्षाची सेवा पुरविणे बंधनकारक करण्याकरिता युडीपीसीआर नियमावलीमध्ये नव्याने तरतूद समाविष्ट करणे आवश्यक असल्याचे मत नोंदविले आहे. त्यानुसार सार्वजनिक, संस्थात्मक इमारतींमध्ये हिरकणी कक्ष उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. इमारतीचा तळमजला अथवा पहिल्या मजल्यावर हिरकणी कक्ष स्थापन करण्यात यावा. तेथे स्वच्छतागृहाची सुविधा असावी, आवश्यक तो उजेड, हवा खेळती राहावी, असे निकष देखील शासनाकडून ठरवून देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

