बिबवेवाडीत रंगणार
‘बालरंगभूमी संमेलन’

बिबवेवाडीत रंगणार ‘बालरंगभूमी संमेलन’

Published on

पुणे, ता. ७ ः बालकलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी बालरंगभूमी परिषदेतर्फे ‘बालरंगभूमी संमेलन’ बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात होणार असल्याची माहिती परिषदेच्या अध्यक्ष अभिनेत्री ॲड. नीलम शिर्के सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे संमेलन शुक्रवार २० ते २२ डिसेंबर दरम्यान सकाळी ९ ते रात्री ९. ३० यावेळेत होणार आहे.
यावेळी बालकलावंतांचे नामांकित कार्यक्रम, गायन, वादन, नृत्य, एकपात्री, नाट्यछटा, बोलक्या बाहुल्यांचे खेळ, पपेट शो आदी कार्यक्रम संमेलनात सादर होणार आहेत. तसेच सिने बाल कलावंत मायरा वायकुळ, नीलेश गोपणार, स्वरा जोशी व इतर बाल कलावंताचे सादरीकरण या निमित्ताने होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिनेते मोहन जोशी असून संमेलनाचे उद्‍घाटन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच प्रशांत दामले, सयाजी शिंदे, अभिनेते व सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष विजय गोखले, सुबोध भावे आदी प्रमुख उपस्थित असणार आहेत. संमेलन समारोप व पुरस्कार सोहळा रविवारी (ता. २२) सायंकाळी ५ वाजता होणार असून या प्रसंगी बालरंगभूमी परिषद पुरस्काराने ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रतिभा मतकरी यांना गौरविण्यात येणार आहे. हे संमेलन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com