‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’मध्ये 
सांधेदुखीच्या आजारावर उपचार

‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’मध्ये सांधेदुखीच्या आजारावर उपचार

Published on

पुणे, ता. ७ : सांधेदुखीसारख्या आजारावर ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’मध्ये शुद्ध आयुर्वेदिक उपचार घेऊन त्यावर पूर्णपणे मात करता येते. त्याचप्रमाणे सांधेदुखीच्या वेदनांचा अनुभव घेतल्याशिवाय या दुखण्यानं होणाऱ्या त्रासाची तीव्रता लक्षात येत नाही. या त्रासातून कायमची सुटका व्हावी, यासाठी धडपड केली जाते. त्यातून विविध ठिकाणी उपचार केले जातात. परंतु, अनेकदा हे उपचार केवळ वरवरची मलमपट्टी ठरतात.
सांधेदुखी, कंबरदुखी आणि तत्सम आजारांतून रुग्णांना कायमचे बरे करण्यासाठी ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’ची सुरुवात झाली. डॉ. टेब आणि डॉ. रुस्तम बी. जिनवाला यांनी जवळजवळ आठ वर्षे याबाबत संशोधन केले. त्यानंतर १९९१ मध्ये त्यांनी पुण्यात ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक’ची स्थापना केली. डॉ. जिनवाला हे आयुर्वेदिक डॉक्टर पारशी समाजातील होते. आपल्या समाजबांधवांचा आणि इतरांचा या त्रासदायक दुखण्यावर उपाय शोधण्यासाठी त्यांनी ही उपचारपद्धती शोधली. गेल्या ३७ वर्षांपासून पुण्यातील ढोले पाटील रोडवर ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक’ची प्रशस्त शाखा आहे. सांधेदुखीमुक्त आयुष्य रुग्णांना जगता यावे ही ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’ची परंपरा डॉ. मंजूषा अवस्थी यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील शाखा दिमाखात पुढं नेत आहे.
उपचारपद्धती निश्चित करण्याआधी डॉक्टर रुग्णाची फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक स्थिती, रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनशक्तीचाही विचार करतात. तसेच उपचार सुरू करण्याआधी रुग्णाच्या काही चाचण्याही केल्या जातात. त्यानंतरच स्वतंत्रपणे प्रत्येक रुग्णाचे औषध तयार केले जाते. उपचार सुरू करतानाच ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’चे तज्ज्ञ डॉक्टर किती कालावधीत रूग्ण पूर्णतः बरे होणार, हे लेखी स्वरूपात लिहून देतात. शिवाय उपचारांसाठी किती खर्च येईल, हेही अगोदरच सांगतात. टेब ट्रीटमेंट क्लिनिक्समध्ये उपचार ओपीडी बेसिस पद्धतीने घेता येतात. रविवारी आणि संध्याकाळनंतरही क्लिनिक सुरू असतं. टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स आठवड्यातील सातही दिवस सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत चालू असतात. मात्र येथे अपॉईंटमेंट घेऊन यावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com