साईश्री आयव्हीएफमध्ये ‘एआय’ प्रजनन तंत्रज्ञान

साईश्री आयव्हीएफमध्ये ‘एआय’ प्रजनन तंत्रज्ञान

Published on

पुणे, ता. ७ ः साईश्री आयव्हीएफ केंद्रामध्ये वीर्य विश्‍लेषण आणि भ्रूण निवड या दोन्ही प्रक्रियांसाठी कृत्रिम बु‌द्धिमत्तेचे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानात शुक्राणूंची संख्या, त्यांची गतिशीलता, आकार यांसारख्या प्रमुख घटकांचे मूल्यांकन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येतो. नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त अचूक निष्कर्ष असल्‍याने ‘आययूआय’ व ‘आयव्हीएफ’ या प्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता अधिक वाढते.
प्रजननासाठीच्या आरोग्यसेवेत ही एक मोठी प्रगती आहे. या तंत्रज्ञानाच्या यंत्रसामग्रीला ‘यूएसएफडीए’ची मंजुरी मिळालेली आहे. साईश्री वंध्यत्व केंद्रातील आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. गिरीश पोटे या संदर्भात म्हणाले, ‘‘एआय-शक्तीवर चालणाऱ्या तंत्रामुळे वैद्यकीय निदानातील अचूकता आणि यशाचा आलेख वाढला आहे. हे यंत्र अतिशय सुटसुटीत व लहान आकाराचे असून ते केवळ ३० मिनिटांत चाचणीचा निष्कर्ष देते. त्यामुळे ते रुग्णांना घरीही वापरता येऊ शकते. रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन तिथे चाचणी करण्याची गरज कमी होऊन रुग्णांची मोठी सोय झाली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com