

पुणे, ता. ७ ः सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात मानवाधिकार कार्यकर्त्या ॲड. रमा सरोदे, ॲड. शाबीर खान, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते विठ्ठल गायकवाड, उद्योजक मिलिंद अहिरे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत धुमाळ यांना ‘संविधान रक्षक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माजी आमदार मोहन जोशी यांच्या वतीने काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार भवन येथे सेवा-कर्तव्य-त्याग कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार डॉ. कुमार केतकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर, माजी नगरसेविका लता राजगुरू, प्रथमेश आबनावे, सौरभ अमराळे, चंद्रशेखर कपोते आदी उपस्थित होते.
संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. डॉ. केतकर यांनी ‘माझे जीवन माझे संविधान’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर खोरे यांनी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला. जोशी यांनी कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.