निवृत्तीसाठी आर्थिक नियोजन महत्त्वाचे 
 सौरभ मुखर्जीया यांचा सल्ला

निवृत्तीसाठी आर्थिक नियोजन महत्त्वाचे सौरभ मुखर्जीया यांचा सल्ला

Published on

(फोटोसह घ्यावे)
गुंतवणुकीचे नियोजन लवकर करा ः सौरभ मुखर्जीया

पुणे, ता. ७ ः निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या आरामदायी होण्यासाठी जीवनशैलीनुसार किती खर्च येतो याचा अंदाज घेऊन तरतूद करायला हवी. त्यासाठी लवकर गुंतवणूक करणे महत्त्वाचे असते. शेअर बाजारातील गुंतवणूक संपत्तीनिर्मितीसाठी एक उत्तम मार्ग आहे. गुंतवणूक जितकी लवकर सुरु करू तेवढी रक्कम कमी लागेल. त्यामुळे लवकर नियोजन करा, असा सल्ला मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचे संस्थापक सौरभ मुखर्जीया यांनी दिला.
‘सकाळ सुहाना स्वास्थ्यम्’ उपक्रमात ‘समग्र आर्थिक कल्याणासाठी आर्थिक नियोजनाचे महत्त्व’ या विषयावर बोलत होते. या वेळी त्यांच्या सहकारी नंदिता राजहंस यांनीही काही संकल्पना स्पष्ट केल्या.
मुखर्जीया पुढे म्हणाले, ‘‘भविष्यातील महागाईचा दर, गुंतवणुकीवरील सरासरी परतावा आणि आपण करू शकणारी गुंतवणूक यांचा ताळमेळ घालावा. सध्या खर्चात साधारण सहा टक्के दराने वाढ होत असून, गुंतवणुकीवर निव्वळ दहा टक्के दराने परतावा मिळेल, असे गृहित धरून निधी आणि त्यानुसार गुंतवणुकीचा अंदाज येईल. निवृत्तीसाठी ३० वर्षे असतील तर साठाव्या वर्षानंतर पुढील २० ते २५ वर्षांच्या आयुष्यासाठी दरमहा एक लाख रुपये मिळतील या हिशेबाने किमान १९ कोटी रुपयांचा निधी जमा करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेअर बाजारात गुंतवणूक करणे हा संपत्तीनिर्मितीचा चांगला मार्ग आहे. अर्थात ही गुंतवणूक करताना त्याची विभागणीही योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे. प्रथम दोन वर्षांची रक्कम बँक ठेवींत ठेवावी, ही साधारण आपल्याकडे असलेल्या एकूण रकमेच्या २० टक्के असेल, उरलेल्या ८० टक्के रकमेपैकी ६० टक्के रक्कम लार्ज कॅप शेअरमध्ये गुंतवावी आणि उर्वरित २० टक्के रक्कम स्मॉल कॅपमध्ये गुंतवावी. एकाच टोपलीत सर्व अंडी ठेवू नयेत. हा गुंतवणुकीचा मूलभूत नियम पाळण्यासह वैविध्यपूर्ण गुंतवणुकीवर भर द्यावा.’’

-----
अमेरिकेतील शेअर बाजारात गुंतवणूक
-----
भारतीय शेअर बाजाराबरोबरच अमेरिकेतील शेअर बाजारात गुंतवणूक करावी. आता परदेशी कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणे सुलभ झाले असून, गुंतवणूक रकमेची उच्च मर्यादा, किचकट नियम आता शिथिल झाले आहेत. ‘गिफ्ट सिटी’मधील आंतरराष्ट्रीय बाजारातील गुंतवणुकीच्या सुविधेमुळे परदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून भरघोस फायदा मिळवणे शक्य आहे. गेल्या २० वर्षांत सर्वाधिक परतावा देणाऱ्या शेअर बाजारात प्रथम क्रमांकावर अमेरिकेचा शेअर बाजार आहे, तर दुसऱ्या स्थानावर भारतीय शेअर बाजार आहे. दोन्ही शेअर बाजारातील परस्परावलंबनाचे प्रमाण अत्यल्प आहे, त्यामुळे एका बाजारात नुकसान झाले, तरी दुसरा बाजार तेजीत असल्याने तिथे भरपाईची संधी जास्त आहे. सध्या ‘चायना प्लस वन’ धोरण अवलंबत अमेरिकेतील अनेक कंपन्या भारतात येत आहेत. त्यामुळे परदेशी कंपन्यांमध्ये विशेषतः अमेरिकी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल, असे मुखर्जीया यांना आवर्जून सांगितले.
----
(चौकट २)
भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीची कारणे

१) शहरी महिलांच्या बँक खात्यांची संख्या आणि खात्यातील शिल्लक रक्कम पुरुषांपेक्षा जास्त
२) ‘निफ्टी’तील नोंदणीकृत ५० टक्के कंपन्यांचे सीईओ, संचालक आयआयएम किंवा आयआयटीचे नव्हेत तर छोट्या शहरांमधून आलेले
३) एकूण देशांतर्गत उत्पादनात (‘जीडीपी’) ५० टक्क्यांहून जास्त वाटा महाराष्ट्र तसेच दक्षिणेकडील तेलंगणसह सात राज्यांचा
४) ‘चायना प्लस वन’ धोरणामुळे अनेक देश उत्पादनासाठी भारताकडे वळल्याने आयटीसह सेल्स, अकाउंटिंग अशा काही क्षेत्रांत भारताला फायदा
५) अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची जागतिक केंद्रे सुरू होणे
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com