घरात बनविलेले जेवणच सर्वांत चांगले ः संजीव कपूर
पुणे, ता. ७ ः ‘‘फळे, पालेभाज्या, कडधान्ये, दुधाचे पदार्थ कमीत कमी प्रक्रिया करून जेवणात घ्यावेत. चांगल्या मनाने, भावनेने बनविलेले जेवण आनंदाने खाल्यानंतर ते सात्त्विक ठरते. जेवण तयार करणाऱ्याचा एक भाव अन्नात उतरलेला असतो. त्यामुळे घरात बनवलेले जेवण जेवढे जास्त खाल तेवढे चांगले ठरते,’’ असे प्रतिपादन प्रख्यात शेफ संजीव कपूर यांनी केले.
‘स्वयंपाकाची सात्त्विक पद्धत आणि वैदिक पाककृती यांचे आरोग्याशी निगडित असलेले महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ‘‘जंकफुड खायचेच असेल तर तेही घरीच करावे. घरात जेवण बनविताना नफा-तोटा पाहिला जात नाही, जो बाहेरचे जेवण बनवताना पाहिला जातो. सात्त्विक जेवण चांगले असते, परंतु ते करणे आता शक्य आहे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. सात्त्विक जेवणाची परिभाषा ठरवायची असेल तर त्यात कडधान्ये, फळे, दुधाचे विविध पदार्थ, बिया यांचा वापर करून चांगल्या मनाने बनवलेले जेवण आनंदाने खाल्यानंतर ते सात्त्विक जेवण ठरते.’’
संजीव कपूर यांचे मुद्दे
- मंदिर आणि स्वयंपाकघरात जास्त फरक नाही.
- फळ कापल्यानंतर त्यावर प्रक्रिया होते, त्यामुळे ते आहे तसेच खावे
- जो ज्या भागात राहतो तिथल्या नैसर्गिक गोष्टी खाण्यात असाव्यात
- जीवनाप्रमाणेच जेवणातही समतोल असावा
- जेवण बनविण्यापूर्वी स्वच्छता करावी
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

