‘वाचन संस्कृती’ला बळ देण्यासाठी पुढे या
पुणे, ता. ७ : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्यावतीने होणाऱ्या ‘पुणे पुस्तक महोत्सवा’ची जय्यत तयारी सुरू असतानाच, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल यांच्या सहभागाने यंदाचा हा महोत्सव अधिक भव्य होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग आणि संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकांनी महोत्सवात सहभागी होत वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केले.
महोत्सवानिमित्त डॉ. देवळाणकर यांनी पुणे विद्यापीठ, उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांना महोत्सवात सहभागी होण्याबाबत सूचना केल्या आहेत. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पुस्तक महोत्सवाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने, महाविद्यालयात आणि वर्गांमध्ये माहिती द्यावी. महाविद्यालयाच्या सूचना फलकांवर महोत्सवाची माहिती आणि विविध उपक्रमांना प्रसिद्धी द्यायची आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील खासगी विद्यापीठांनाही महोत्सवात आपला सहभाग नोंदवता येणार आहे, असे आवाहन डॉ. देवळाणकर यांनी केले.
विद्यार्थ्यांसाठी भरपूर संधी
महोत्सवात ‘शांतता...पुणेकर वाचत आहे’, ज्ञानसरिता ग्रंथ दिंडी, ग्रंथपालांचे संमेलन असे उपक्रम सुरुवातीच्या टप्प्यात होणार आहेत. यात विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल, कर्मचाऱ्यांना सहभागी होता येणार आहे. तसेच, संमेलनात शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, कवी, लेखक, चित्रकार, पत्रकार, उद्योजक यांना भेटण्याची संधी मिळणार आहे, असे महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले.
१४ ते २२ डिसेंबरदरम्यान महोत्सव
पुणे पुस्तक महोत्सव १४ ते २२ डिसेंबर दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणावर होणार आहे. महोत्सवाला पुणे, नगर, नाशिक यांसह राज्यातील विविध ठिकाणचे वाचनप्रेमी भेट देणार आहेत. त्या अनुषंगाने आकर्षक मंडप आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मोठ्या व्यासपीठाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

