पर्यटन बस सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे, ता. ७ ः ‘पीएमपी’च्या पुणे दर्शन आणि पर्यटन बस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. पुणे दर्शनाच्या तुलनेत पर्यटन बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. ऑक्टोबर व नोव्हेंबरच्या पुणे दर्शनमधून एक लाख ९८ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले, तर पर्यटन बस सेवेतून दोन लाख ७७ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. ‘पुणे दर्शन’ आणि ‘पर्यटन बस’ सेवा वातानुकूलित ई-बसेसव्दारे प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्टी आणि इतर दिवशी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १५ ते २० प्रवाशांनी बुकिंग केल्यास कोणत्याही दिवशी बस सोडण्यात येते, अशी माहिती ‘पीएमपी’ प्रशासनाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

