वेलनेस एक्स्पोला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ७ : उत्तम स्वास्थ्याची गुरुकिल्ली मिळविण्याच्या उद्देशाने पुणेकरांनी शनिवारी सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थम््मधील वेलनेस एक्स्पो उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध वस्तू, उत्पादनांची खरेदी केली. या एक्स्पोला भेट देऊन आरोग्यविषयक माहिती घेण्याची नागरिकांना रविवारी (ता. ८) अखेरची संधी आहे.
निरोगी जीवनशैलीसाठी उत्तम शारीरिक स्वास्थ्याबाबत शास्त्रीय मार्गदर्शन करणारा एक्स्पो पंडित फार्मच्या हिरवळीवर सुरु आहे. त्यात दागिने, सुगंधी द्रव्ये, विविध मसाले, भरडधान्ये, सेंद्रिय पदार्थ, म्युझिक थेरपी, आरोग्य विषयक उपकरणे आदींचे ७५ पेक्षा जास्त स्टॉल आहेत. सर्व वयोगटांतील लोकांसाठी लाभदायक, तणावमुक्त जीवनशैली, रोगप्रतिकारशक्तीतील वाढ आणि आध्यात्मिक विकास, ज्ञानप्राप्तीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी येथे एकाच छताखाली उपलब्ध आहेत. एक्स्पोला सकाळपासूनच नागरिकांची गर्दी होती. आकर्षक सजावट, संगीताचे सूर अशा प्रसन्न वातावरणात पुणेकर विविध स्टॉलवर माहिती घेत होते. आवश्यक खरेदीनंतर आणि उपयुक्त माहिती घेतल्यानंतर त्यांची पावले फूडकोर्ट कडे वळली. तेथे त्यांनी आवडत्या खाद्यपदार्थांची चव चाखली.
.........
असा आहे एक्स्पो
या एक्स्पोमध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि नैसर्गिक उपचारांवर आधारित उत्पादने, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले अन्नपदार्थ, धान्य तसेच मसाले व खाद्यपदार्थ आहेत. योगा, प्राणायाम, ध्यानधारणा यांसारख्या आरोग्यात सुधारणा करणाऱ्या कार्यशाळा घेणाऱ्या संस्था आणि अर्थ आणि वित्तीय माहिती, आहारतज्ज्ञ आणि आरोग्यतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.
........
मागील दोन वर्षांपासून मी एक्स्पोला मी भेट देते आहे. मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे मानसिक समाधान मिळते. एक्स्पोमध्ये खरेदी करण्यासाठी आरोग्यासाठी लाभदायक असलेले वेगवेगळे पाहायला आणि खरेदी करायला मिळतात.
- नंदिनी गाणू, कर्वेनगर
---
लेखकांशी संवाद
वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी सकाळ प्रकाशन आणि क्रॉस वर्डतर्फे पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्यातील ‘लेखक कट्टा’ उपक्रमाच्या अंतर्गत शनिवारी विविध लेखकांनी वाचक, नागरिकांशी संवाद साधला. त्यात मिलिंद वाटवे यांनी ‘पुरुषातला नर, स्त्रीमधील मादी काय सांगते’ या विषयावर, केदार कामत यांनी ‘प्राचीन ज्ञान-आधुनिक उपाय’ या विषयावर विचार मांडले. संजय कप्तान यांनी ‘झेन-एक जीवनशैली’ याविषयी मार्गदर्शन केले. अंजली पर्वते यांच्या उपनिषद कथा या पुस्तकाचे प्रकाशन झाले. रविवारीही (ता. ८) विविध लेखक वाचकांच्या भेटीला येणार आहेत.
......,....
फोटो ओळी
पंडित फार्म ः सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम् मधील वेलनेस एक्स्पोला शनिवारी पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

