चोरलेल्या मुकुटाची मुंबईत विक्री
पुणे, ता. ७ ः सॅलिसबरी पार्क येथील एका सदनिकेच्या देवघरातून चोरलेला भगवान महावीरांचा सोन्याचा मुकुट व चैन मुंबई येथील झव्हेरी बाजार येथील एका दुकानात विकल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दुकानाचे मालक सनी मेटकरी यांना भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम ३५ (३) अन्वये स्वारगेट पोलिस ठाण्यात हजर राहण्याबाबत नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती सहायक सरकारी वकील भाग्यश्री संचेती (डागळे) यांनी न्यायालयाला दिली. गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या नरेश अमरचंद जैन (वय ४८, रा. गिरगाव, मुंबई) याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्याला शनिवारी (ता. ७) न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी, न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत नऊ डिसेंबरपर्यंत वाढ केली.
जैन याने केलेला गुन्हा दखलपात्र स्वरूपाचा आहे. त्याचे अन्य कोणी साथीदार आहे का यासह ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या मुद्यांवर तपास करणे बाकी असल्याने आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद अॅड. संचेती यांनी केला. न्यायालयाने बचाव पक्षासह सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपीच्या पोलिस कोठडी वाढ केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

