दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयात आंदोलन

दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयात आंदोलन

Published on

पुणे, ता. १२ : राज्यातील दिव्यांगांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयाच्‍या दालनात दिव्यांग बांधवांच्या वतीने ‘प्रहार’ संघटनेचे राज्य अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्‍या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त डॉ. प्रवीण पुरी यांनी दिव्यांग प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा करत मागण्यांबाबत सरकारला कळविणार असल्याचे सांगितले.
या मागण्‍यांमध्‍ये दिव्यांगाना सहा हजार रुपये महिना पेन्शन मिळावी, स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय आरक्षण देण्यात यावे, भूमिहीन, बेघर दिव्यांगांना राहण्यासाठी जागा द्यावी, सरकारी नोकरीतील दिव्यांगांचा अनुशेष रिक्त जागा भरून काढण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ‘प्रहार’चे राज्य अध्यक्ष धर्मेंद्र सातव पाटील, कोकणचे विभागीय अध्यक्ष सुरेश मोकल, मीरा भाईंदरचे काजल नाईक, विदर्भ प्रमुख हनुमंत झोटिंग, सोलापूर जिल्हाध्यक्ष चौगुले, राष्ट्रपती पुरस्कार विजेते जतीन शहा व इतर जिल्ह्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते. आंदोलन यशस्वी होण्यासाठी जिल्हाध्यक्ष शरद जाधव, जिल्हा महिलाध्यक्ष अनिता कदम, शहराध्यक्ष विष्णू गुंडाळ, सुनंदा बामणे यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com