उद्योजक, व्यावसायिकांसाठी पुण्यात नववर्षात परिषद
पुणे, ता. ११ ः काळानुरूप बदलणाऱ्या तंत्रज्ञानासह जागतिक पातळीवरील उद्योग-व्यवसायांतील उपलब्ध संधी, विस्तार आणि परदेशी गुंतवणुकीची माहिती उद्योजकांना मिळावी, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, अमेरिकास्थित ‘गर्जे मराठी ग्लोबल’, ‘महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्हचे (उद्योजक परिषद) आयोजन करण्यात आले आहे.
म्हाळुंगे-बालेवाडीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ही परिषद होईल. यात अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया तसेच इतर देशांचे उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार सहभागी होतील. ‘गर्जे मराठी ग्लोबल’चे अध्यक्ष आनंद गानू, पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे कार्यकारी संचालक गिरीश देसाई आणि महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष अतुल शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी मंडळाच्या महासंचालक शीतल पांचाळ, नवउद्योजक सागर बाबर आणि संयोजक सचिन इटकर उपस्थित होते.
परिषदेत राज्यातील सुमारे ५०० व्यावसायिक, नवउद्योजक, कल्पक उद्योजक भाग घेतील. ‘गर्जे ग्लोबल’मार्फत परदेशातील शंभराहून जास्त व्यावसायिक, उद्योजक व मान्यवरांचा सहभाग असेल. त्यांना उद्योग-व्यवसायातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.
व्यवसायाच्या संधी, बदलत्या संकल्पना, निर्मिती क्षेत्रातील उद्योजकता यांविषयीही तज्ज्ञ अनुभव सांगतील. या माध्यमातून महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक वाढावी, म्हणून प्रयत्न केले जातील.
परिषदेतील सहभागासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. अधिक माहितीसाठी www.gmgpcumedc.com या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

