कुष्ठरोग मुक्तीसाठी ‘कुसुम’ विशेष मोहीम

कुष्ठरोग मुक्तीसाठी ‘कुसुम’ विशेष मोहीम

Published on

पुणे, ता. १३ : कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) ही विशेष मोहीम राज्यभरात सोमवार (ता. १६) ते शुक्रवार (ता. २०) यादरम्यान राबवली जाणार आहे. आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी मोहिमेतून २०२३-२४ या कालावधीत आत्तापर्यंत सर्वात जास्त २० हजार एक नवीन कुष्ठरुग्ण शोधण्यात आले आहेत.
नियमित कुष्ठरोग तपासणी मोहिमेतून अनेकदा वीटभट्टी कामगार, खाण कामगार, स्थलांतरित व्यक्ती, बांधकाम मजूर निवासी आश्रमशाळेत राहणारे विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य नसते. त्यामुळे या तपासणीपासून वंचित असणाऱ्यांसाठी ही विशेष मोहीम शासनाकडून घेण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने २०२७पर्यंत शून्य कुष्ठरुग्ण प्रसार हे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांना औषधोपचार देणे आवश्यक आहे. यासाठी नियमित आणि विशेष सर्वेक्षणामध्ये वंचित राहणाऱ्या गटांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या कालावधीत आशा आणि पुरुष स्वयंसेवकांच्या मदतीने प्रत्यक्ष सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘कुसुम’ मोहिमेचा दररोजचा अहवाल राज्यस्तरावर सादर करायचा आहे. अहवालाचे विश्‍लेषण करून त्याप्रमाणे कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

यावर देणार अधिक भर
संशयितांची त्वरित तपासणी करणे, निदान आणि उपचार करणे, पूर्ण कालावधीचा उपचार, उपचारादरम्यान आणि उपचारानंतर पाठपुरावा, सर्व कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच त्यांच्या सहवासात असलेल्यांची तपासणी आणि पात्र सहवासी यांना प्रतिबंधात्मक उपचार देण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com