न वटलेल्या धनादेशाची रक्कम व्याजासह परत करावी

न वटलेल्या धनादेशाची रक्कम व्याजासह परत करावी

Published on

पुणे, ता. १३ : ग्राहकाला दिलेला २५ हजार ८०० रुपये किमतीचा धनादेश न वटल्या प्रकरणात एका नर्सरीला ग्राहक आयोगाने दणका दिला आहे. न वटलेल्या धनादेशाचे २५ हजार ८०० रुपये नऊ टक्के व्याजासह निकालाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसांच्या आत देण्यात यावेत, तसेच मानसिक व आर्थिक नुकसानभरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी दहा हजार रुपये देण्यात यावेत, असा आदेश आयोगाने दिला आहे.
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अरुण गायकवाड, सदस्या प्रणाली सावंत, कांचन गंगाधरे यांनी हा निकाल दिला. याप्रकरणी हर्षवर्धन पोतनीस यांनी अ‍ॅड. श्रीराम करंदीकर यांच्यामार्फत मातोश्री नर्सरी विरोधात ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. मातोश्री नर्सरीने दिलेल्या दोन लाख ३४ हजार रुपयांच्या पूर्वगणनपत्रकानुसार पोतनीस यांनी २८ ऑगस्ट २०२१ रोजी दोनशे आंब्यांच्या रोपांसाठी नोंदणी केली. त्यासाठी त्यांनी पाच हजार रुपये आगाऊ दिले होते. नर्सरीने दिलेल्या पूर्वगणनपत्रकामध्ये आंब्याच्या रोपांसह त्यासाठी लागणारे खड्डे खोदणे, खते, औषधे, वाहतूक, मजुरी व लागवड यांचा समावेश होता, तर रोपांची उंची सहा फूट असेल, असे सांगण्यात आले होते. दोनशे रोपांची नोंदणी करूनही १६० रोपे पाठविण्यात आली. त्यापैकी चाळीस रोपे ही फक्त चार ते पाच फूट होती. रोपांची उंची कमी पडल्याने नर्सरीने रोपांची रक्कम १०० रुपयांनी कमी करीत २५ हजार ८०० रुपयांचा धनादेश तक्रारदारांना दिला. मात्र, तो न वटल्याने पोतनीस यांनी ग्राहक आयोगात धाव घेत धनादेशाची रक्कम व्याजासह मिळण्यासह नुकसानभरपाई मिळण्यासाठी तक्रार दाखल केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com