आज पुण्यात १४ डिसेंबर २०२४ शनिवार
आज पुण्यात १४ डिसेंबर २०२४ शनिवार
.................................
सकाळी ः
प्रकाशन समारंभ ः मधुश्री प्रकाशन आयोजित ः विशाल कर्णिक रचित ‘दरवळ कवितांचा’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन ः हस्ते- अरुण कुलकर्णी ः प्रमुख उपस्थिती- प्रतिभा हंप्रस, ॲड. संतोष खामकर, डॉ. राजेंद्र झुंजारराव, माधुरी इंगळे व पराग लोणकर ः हॉटेल मोईस्टोन, हडपसर ः ९.३०.
कायदा सल्ला व मार्गदर्शन ः पुणे जिल्हा काँग्रेस कमिट (लीगल सेल) आयोजित ः मोफत कायदा सल्ला व मार्गदर्शन ः सहभाग- ॲड. राहुल ढाले, ॲड. संतोष जाधव, ॲड. अनिल कांकरिया, ॲड. विद्या पेळपकर, ॲड. प्रकाश शितोळे ः काँग्रेस भवन, शिवाजीनगर ः ११.००.
दुपारी ः
भक्ती-स्वरगंध मैफल ः औदुंबरवासी श्री दत्त मंदिर ट्रस्टतर्फे ः दत्तजयंतीनिमित्त पं. यादवराज फड यांच्या अभंगवाणीची ‘भक्ती स्वरगंध’ संगीत मैफल ः हार्मोनियमवर पं. संजय गोगटे ः तबल्यावर अविनाश पाटील ः सुनील पासलकर हे स्वरसाथ करतील ः औदुंबरवासी श्री त्त मंदिर ट्रस्ट, न्यू मॉडर्न कॉलनी, जय भवानीनगर, पौड रस्ता ः ३.००.
जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा ः गुरुदत्त फाउंडेशन आणि पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आयोजित ः जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम ः श्रीदत्त जयंतीनिमित्त सोहळा ः १४१ भवानी पेठ, तिवारी मॅन्शनशेजारी, कल्पतरू प्लाझाजवळ ः ३.००.
सायंकाळी ः
पुरस्कार वितरण ः गदिमा प्रतिष्ठानतर्फे ः महाराष्ट्राचे वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ः गदिमा पुरस्कार (आशा काळे) विद्याताई माडगूळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गृहिणी सखी सचिव पुरस्कार (प्रिया बेर्डे), चैत्रबन पुरस्कार (क्षितिज पटवर्धन), विद्या प्रज्ञा पुरस्कार (मनीषा निश्चल) ः प्रमुख पाहुणे- श्रीनिवास भणगे ः डॉ. न. म. जोशी यांचा विशेष सत्कार ः ‘गदिमा गीतां’चा कार्यक्रम स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे ः टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता ः ५.००.
...................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

