शंख साधना कार्यशाळा
पुणे, ता. १३ : भारतीय संस्कृतीमध्ये शंख व त्याच्या ध्वनीला पावित्र्य आहे. ही एक खूप प्राचीन साधना आहे. शंख साधनेद्वारे श्वासोच्छवास लांब होतात व दम्यासारखे श्वसनाचे व थायरॉईड, रक्तदाब, मधुमेह संबंधित आजार बरे होतात असा अनेकांचा अनुभव आहे. ज्या व्यक्ती धूम्रपान करतात त्यांनी नियमित शंख साधना केल्यास धूम्रपानाचे व्यसन दूर होते. नियमित योगसाधना करणाऱ्यांनी शंखसाधना केल्यास अंतःकरण अधिक शुद्ध होण्यास मदत होते. मुली आणि महिलाही ही साधना करू शकतात. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १५) शंख साधनेविषयी प्रात्यक्षिकासह माहिती देणारी कार्यशाळा आयोजिली आहे. यामध्ये शंख व सनातन धर्म, शंखाचे प्रकार, शंखाची नैसर्गिक निर्मिती, शंख नाद, शरीर व योगाची माहिती व शंख नादाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
शेवगा लागवड, उत्पादन व निर्यात संधी
स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात नियमित मागणी असणाऱ्या शेवग्याचा आयुर्वेद औषधींमध्येही वापर वाढला आहे. आहार तज्ज्ञांनीही आहारात शेवग्याचा वापर फायदेशीर असल्याचे म्हटले आहे. अशा या भरपूर संधी असलेल्या शेवगा पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती, पीक व्यवस्थापन व निर्यात व्यवस्थापनाबाबत माहिती करून देणारी कार्यशाळा २२ डिसेंबरला आयोजिली आहे. बांधावरचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेवगा पिकाला आता व्यापारीदृष्ट्या महत्त्व आले आहे. कार्यशाळेत निर्यातक्षम शेवगा उत्पादन पद्धती, आधुनिक जाती, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणी, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, निकष, ट्रेसिबिलीटी, गुणवत्तेची पडताळणी, निर्यातीसाठी बाजारपेठा, शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायनमुक्त उत्पादन, निर्यातीसाठी कागदपत्रांची पूर्तता इ. संदर्भात नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ८४८४८११५४४
बांधावरच वाढवा सूक्ष्मजीव; बनवा जैविक अर्क
शेतीचा उत्पादन खर्च कमी राखणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे, मातीचे आरोग्य जपणे, सेंद्रिय कर्ब वाढवणे, रसायनमुक्त शेतमाल उत्पादन घेणे या उद्देशाने शेतीत काम करावयाचे असेल तर भोवताली उपयुक्त, शेतीपूरक अशा मित्रकीटकांची परिसंस्था उभारणे आवश्यक ठरणार आहे. तसेच आसपास उपलब्ध नैसर्गिक स्रोतांचा अवलंब करत जैविक अर्क, पोषणघटकांची बांधावरच निर्मिती करावी लागणार आहे. याबाबतचे प्रात्यक्षिकासह तांत्रिक मार्गदर्शन करणारे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण एरंडा, जि. वाशीम येथे २१ व २२ डिसेंबरला आयोजिले आहे. प्रशिक्षणानंतर अशा नैसर्गिक, जैविक निविष्ठांचे उत्पादन घेण्यासाठी प्रशिक्षकांकडून नियमित दिशादर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षणात शेतबांधावर प्रयोगशाळा कशी उभारावी, ट्रायकोडर्मा, मेटारायझियम अशा काही प्रमुख उपयुक्त बुरशींची निर्मिती, जैविक, सेंद्रिय निविष्ठांचे उत्पादन, नैसर्गिक अर्क तयार करणे, गोमूत्र तसेच काही विशिष्ट निविष्ठांपासून वेगवेगळे बुरशीनाशक किंवा रोग व कीडनाशक तयार करणे आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ३००० रुपये.
संपर्क : ८९५६७१२६३१, ८४८४८२२३७७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

