वसतिगृहाच्‍या जागेबाबत 
समितीने केली चौकशी

वसतिगृहाच्‍या जागेबाबत समितीने केली चौकशी

Published on

पुणे, ता. १३ : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बांधण्‍यात येणाऱ्या वसतिगृहाची इमारत मैदानावरच बांधण्‍यात येणार होती. मात्र, विद्यार्थ्यांनी त्‍याविरोधात तक्रारी केल्‍यानंतर वैद्यकीय शिक्षण व आयुष खात्‍याच्‍या आयुक्‍तांनी चौकशी करण्‍यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती नियुक्‍त केली होती. शुक्रवारी समितीने जागेची पाहणी करून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला व त्‍याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे.
डॉ. चंदनवाले यांच्‍या अध्‍यक्षतेखाली असलेला समितीमध्‍ये सदस्‍य म्‍हणून बी. जे. च्‍या सामाजिक वैद्यकशास्‍त्र विभागाचे प्रा. डॉ. मुरलीधर तांबे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांचा समावेश होता. समितीने जिल्‍हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्‍या वसतिगृहाच्‍या सध्‍या प्रस्‍तावित केलेल्‍या जागेची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी मैदानावर इमारत बांधण्‍याला विरोध केला व त्‍याऐवजी रेक्‍टर बंगल्‍याच्‍या जागेवर ही इमारत बांधण्‍यात यावी, अशी मागणी केली. यावेळी समितीने सर्व नोंदी घेतल्‍या.

वसतिगृहाच्‍या निश्चित केलेल्‍या जागेची पाहणी समितीने केली असून विद्यार्थ्यांच्‍या भावना जाणून घेतल्‍या. तसेच त्‍यांच्‍या मागणीनुसार इतरत्र जागेची पाहणी केली असून याबाबतचा अहवाल लवकरच वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्‍या आयुक्‍तांना सादर केला जाईल.
- डॉ. अजय चंदनवाले,
संचालक, वैद्यकीय शिक्षण संचालनालय, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com