पुणे पुस्तक महोत्सवाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे, ता. १३ : विविध पुस्तकांची ६०० दालने, भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी बाल चित्रपट महोत्सव, कार्यशाळा, तसेच लिट फेस्टिव्हल अशा कार्यक्रमांची मांदियाळी असणारा पुणे पुस्तक महोत्सव शनिवारपासून (ता. १४) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानात सुरू होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सव १४ ते २२ डिसेंबरदरम्यान होणार आहे. महोत्सवादरम्यान भारतीय भाषांमधील पुस्तकांची दालने सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सुरू राहतील, अशी माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे (एनबीटी) विश्वस्त राजेश पांडे यांनी दिली. पुणे पुस्तक महोत्सवात यंदा २० ते २२ डिसेंबर या कालावधीत लिट फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. यात २५ पेक्षा अधिक सत्र विविध विषयांवर होणार आहेत. हे कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये होणार असून, ते मोफत राहणार आहेत.
आज होणारे कार्यक्रम...
- महोत्सवाचे उद्घाटन, हस्ते- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (सायं. ५ वाजता)
- सरस्वती वंदना (सायं. ७ वाजता)
- चांदणे स्मरणाचे- एक काव्यानुभूती (सायं. ७.१५)
- स्थळ : फर्ग्युसन महाविद्यालयाचे मैदान
बालचित्रपट महोत्सवातील चित्रपट/लघुपट
धरण (डॅम वॉल) (स. ११ वा.), पीपल (दु.१२.३५ वा.), झाफरानियेह (दु. १.१० वा.), होम कुकिंग (दु. १.२५ वा.), बहरूपियाँ (दु. १.४० वा.), व्हिस्पर टू द व्हॉइड (दु. २ वा.), लॉस्ट (दु. २.१५ वा.), बॉटल्स (दु. २.३५ वा.), छोटा भीम मिशन मंगलयान (दु. २.५५ वा.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

