वाचन चळवळ बळकटीकरणासाठी चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार
पुणे, ता. १३ : पुणे पुस्तक महोत्सवात सर्वसामान्य नागरिकांना सहभागी होऊन पुस्तकांची मनसोक्त खरेदी करता यावी, यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. कोथरूड मतदारसंघातील नागरिकांना प्रत्येकी १०० रुपये सवलतीचे कुपन, त्याचप्रमाणे सोसायटीच्या वाचनालयासाठी पुस्तक खरेदी केल्यानंतर त्यावर एक हजार रुपये सवलतीचे कुपन देण्यात येईल. नागरिकांना सवलतीचे हे कुपन पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून मिळतील, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
हे सवलतीचे कुपन पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघातील सर्व जनसंपर्क कार्यालयात १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे कोथरूड मतदार संघातील नागरिकांनी जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन, सवलतीचे कुपन घ्यायचे आहे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

