‘गदिमा पुरस्‍कारां’चे 
आज पण्यात वितरण

‘गदिमा पुरस्‍कारां’चे आज पण्यात वितरण

Published on

पुणे, ता. १३ ः गदिमा प्रतिष्‍ठानतर्फे साहित्‍य, चित्रपट व कला या क्षेत्रांसाठी देण्यात येणाऱ्या ‘गदिमा पुरस्‍कारां’चे उद्या (ता. १४) वितरण होईल. यंदा विख्‍यात अभिनेत्री आशा काळे यांना मुख्य पुरस्कार जाहीर झाला आहे. टिळक रस्‍त्‍यावरील टिळक स्‍मारक मंदिर येथे हा कार्यक्रम होईल.
दिवंगत अभिनेते लक्ष्‍मीकांत बेर्डे यांच्‍या पत्‍नी प्रिया यांना ‘गृहिणी सखी सचिव’, क्षितिज पटवर्धन यांना ‘चैत्रबन’, तर मनीषा निश्‍चल यांना ‘विद्या प्रज्ञा’ हे पुरस्‍कार देण्यात येतील. ज्‍येष्‍ठ नाटककार श्रीनिवास भणगे प्रमुख पाहुणे असतील, अशी माहिती संस्‍थेचे कार्यकारी विश्‍वस्‍त आनंद माडगूळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रतिष्‍ठानचे विश्‍वस्‍त प्रा. प्रकाश भोंडे आणि शिवराम कोल्‍हटकर उपस्थित होते.
चित्रपट कथा व गीते, कथासंग्रह, कादंबऱ्या, नृत्‍यनाटिका व गीतरामायण असा नजराणा महाराष्‍ट्राला देणाऱ्या गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात गदिमा यांचा येत्या १४ डिसेंबरला ४७ वा स्‍मृतिदिन आहे. त्‍यानिमित्त गदिमा प्रतिष्‍ठानतर्फे विविध पुरस्‍कार देण्‍यात येतात.
आशा काळे यांनी चित्रपट व नाटक अशा दोन्‍ही माध्‍यमांतून अभिनयाची प्रदीर्घ कारकीर्द घडविली. अभिनेत्री तसेच कर्तृत्ववान गृहिणी म्‍हणून प्रिया बेर्डे यांची ओळख आहे. क्षितिज पटवर्धन यांनी कथाकार, पटकथाकार, संवाद लेखक तसेच गीतकार म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मनीषा निश्‍चल या नव्‍या उभारीच्‍या गायिका म्‍हणून परिचित आहेत. या वेळी शिक्षणतज्‍ज्ञ व ज्‍येष्‍ठ लेखक न. म. जोशी यांचा प्रतिष्‍ठानच्‍या वतीने विशेष सत्‍कार करण्‍यात येईल.
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com