स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे स्नेहसंमेलन

स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे स्नेहसंमेलन

Published on

पुणे, ता. १३ ः यंदा भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीचे वर्ष, भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीचे वर्ष अशा त्रिवेणी संगमाच्या निमित्ताने आयोजित स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
वस्ती विकास प्रकल्पातील वस्त्यांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापारेषण पुणेचे सहाय्यक महाव्यवस्थापक प्रमोद गोडसे, विद्या समीक्षा केंद्र, महाराष्ट्र राज्याचे प्रभारी दत्तात्रेय वाडेकर उपस्थित होते. यासोबतच स्वानंदचे विश्वस्त मंडळ व कार्यकारी मंडळ सदस्य सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित होते.
प्रास्ताविक स्वानंदच्या कार्यकारी मंडळ सदस्या सारिका वाघ यांनी केले. भारतीय संविधान दिनानिमित्त स्मार्ट अभ्यासिका केंद्रावरती प्रश्नमंजूषा घेण्यात आली होती. त्यामधील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्वानंदचे कोषाध्यक्ष मकरंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व स्वानंदच्या कार्यकारी मंडळ सदस्या रंजना दीक्षित यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com