गुन्हे वृत्त
एटीएममधून पैसे काढताना ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक
पुणे, ता. १३ : बेलबाग चौकात एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी २० हजारांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वारजेतील एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकाजवळ नगर वाचन मंदिराजवळ आले होते. ते एटीएम केंद्रातून पैसे काढण्यासाठी गेले. त्यांच्या पाठोपाठ एटीएममध्ये शिरलेल्या चोरट्याने त्यांचे कार्ड अदलाबदली केले. त्यानंतर मदतीच्या बहाण्याने चोरट्याने ज्येष्ठाच्या खात्यातून २० हजारांची रोकड चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक पी. एम. वाघमारे करीत आहेत.
सुरक्षारक्षकाला चाकूचा धाक
दाखवून लुटण्याचा प्रयत्न
पुणे, ता. १३ : मार्केट यार्ड परिसरातील कराड अर्बन बँकेतील सुरक्षारक्षकास चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुरक्षारक्षक विजय महादेव गायकवाड (वय ५५, रा. शिवदर्शन) यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एका १७ वर्षीय मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड मार्केट यार्डातील कराड अर्बन बँकेत सुरक्षारक्षक आहेत. गुरुवारी (ता. १३) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास बँकेच्या आवारात आलेल्या अल्पवयीन मुलाने गायकवाड यांना चाकूचा धाक दाखवत पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. सुरक्षारक्षकाशी झटापट झाल्यानंतर चोरटा पसार झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश जगताप करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

