नद्या प्रदूषणाबाबत सूक्ष्म नियोजन सुरू ः डॉ. ढाकणे

नद्या प्रदूषणाबाबत सूक्ष्म नियोजन सुरू ः डॉ. ढाकणे

Published on

पुणे, ता. ३० : ‘‘इंद्रायणी पाठोपाठ मुळा-मुठा, रामनदीसह राज्यातील ज्या नद्यांचे प्रदूषण होत आहे. ते रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे काम सुरू असून, लवकरच त्याबाबतचा आराखडा तयार केला जाणार आहे,’’ अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. या वेळी लोककला अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, पालखी पदाधिकारी बाबा होनमाने, जयंत चतुर उपस्थित होते.

इंद्रायणी प्रदूषणाबद्दल डॉ. ढाकणे म्हणाले, ‘‘गेल्या सहा महिन्यांपासून यावर काम सुरू आहे. नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी तीन टप्प्यांत काम करावे लागणार आहे. नगरपालिका, महापालिका येथून जे सांडपाणी नदीत येते, ते रोखण्याच्या सूचना दिल्या आहेत. उर्वरित भागातील आराखडा पर्यावरण विभागाकडून करण्यात येत आहे. इंद्रायणी नदीत कोणतीही रासायनिक कंपन्यांकडून पाणी सोडले जात नाही. नदीत जो फेस येतो, तो डिटर्जंट पावडरचा आहे. त्यामुळे याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये. प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे. वारी दरम्यान शक्य तेथे मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात येऊन वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. एकल वापराच्या प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे बंद करावा आणि खरेदीला जाताना नेहमी कापडी पिशवी सोबत ठेवण्याचा सर्वांनी संकल्प करावा.’’

लोककलेच्या माध्यमातून जनजागृती
पर्यावरणाचे प्रश्न हे व्यापक असल्याने वारीत सहभागी होणाऱ्या दहा लाख वारकऱ्यांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी गेल्या चौदा वर्षांपासून ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम सुरू आहे. याद्वारे पर्यावरण संरक्षण व संवर्धनात लोकजागृतीचे पुढचे पाऊल टाकले जात आहे. वारीत सहभागी होणाऱ्या ग्रामीण जनतेला लोककला प्रकार हा अत्यंत जवळचा असल्याने या माध्यमातून लोकजागृती करण्यात येते. या पायी वारीत मुक्कामाच्या ठिकाणी लोककला प्रकारांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.