कुशल महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्न करावा : मंगलप्रभात लोढा

कुशल महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्न करावा : मंगलप्रभात लोढा
Published on

पुणे, ता. २ : आषाढी वारी सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित कौशल्य विकास दिंडीत नागरिक व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन ‘कुशल महाराष्ट्र - रोजगार युक्त महाराष्ट्र’चा संकल्प करावा, असे आवाहन राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी (ता. २) केले.

कौशल्य विकास दिंडीचे उद्‌घाटन लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, संचालक दिगंबर दळवी, उपआयुक्त अनुपमा पवार, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर आदी यावेळी उपस्थित होते.

लोढा म्हणाले, ‘‘कौशल्य विकास, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या विविध योजना, कौशल्याबाबतचे ज्ञान व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचावी यादृष्टीने कौशल्य विकास दिंडीचे आयोजन केले आहे. कौशल्य विकासात राज्य अग्रेसर राहावे, युवकांनी कौशल्य आत्मसात करावे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर टप्प्याटप्प्याने कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येतील. या केंद्रांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.’’

या दिंडीमध्ये शासकीय, अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पूर्व व्यावसायिक संस्था, किमान कौशल्य आधारित संस्था, द्विलक्षी अभ्यासक्रम संस्था, प्रमाणपत्र अभ्यासक्रम संस्था आणि कौशल्य विकास विद्यापीठ तसेच रोजगार स्वयंरोजगार विभागाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, स्टार्ट अप उपक्रमाचे लाभार्थी, ग्रामीण कौशल्य विकास केंद्रातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com