शहरातील विविध भागात 
चार घरफोडीच्या घटना

शहरातील विविध भागात चार घरफोडीच्या घटना

Published on

पुणे, ता. २ ः शहरातील वेगवेगळ्या भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सहा लाख रुपयांचा ऐवज चोरला. याप्रकरणी विश्रांतवाडी, विमानतळ आणि बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्रांतवाडीतील धानोरी भागात एका बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने आणि रोकड असा दोन लाख ११ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत एका महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार महिला बेळगाव येथे गेल्या होत्या. चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून ऐवज चोरून नेला. धानोरी भागातील एका दवाखान्याचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी ३० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. याबाबत डॉ. निखिल अशोक भालेराव (वय ३६, रा. लोहगाव) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
लोहगाव भागातील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोकड, तसेच दागिने असा दोन लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना लोहगाव भागात घडली. याबाबत एका महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार महिला लोहगाव भागातील जे. के. पार्क सोसायटीत राहायला आहे. पोलिस कर्मचारी यू. आर. झेंडे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
बिबवेवाडी परिसरातील बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने आणि रोकड असा दोन लाख ३२ हजारांचा ऐवज चोरून नेला. याबाबत वाती गणेश शिंदे (वय २६, रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शिंदे या बंगल्याला कुलूप लावून सोमवारी (ता. १) दुपारी बाहेर गेल्या होत्या. चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडले. बेडरुममधील कपाट उचकटून रोकड लंपास केली. शिंदे यांच्या शेजारी अतुल विलास शेंडकर यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातून तीन हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. पोलिस हवालदार जाधव तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.