व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळा

व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळा

पुणे, ता. २ : अनेकदा व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो, मात्र तो एडिट करताना अडचण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर सदर कार्यशाळेचे आयोजन ६, ७ तसेच १३, १४ जुलैला करण्यात आले आहे. यात एडिटिंगचे महत्त्व, वंडरशेअर फिल्मोरा १२ व इनशॉट या दोन लोकप्रिय एडिटिंग साधनांचा वापर करून एडिटिंग कसे करावे, स्मार्ट एडिटिंगचे तंत्र, टाइमलाइनमध्ये क्लिप कट करणे, व्हिडिओमध्ये मजकूर व संगीत जोडणे, आवाजाचे एडिटिंग, ग्रीन स्क्रीन व क्रोमा कीइंग इफेक्ट, वेगवेगळे फिल्टर लावणे, मोशन ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स, ऑडिओ ॲडजेस्टमेंट व व्हॉईसओव्हर, स्मार्टफोन वापरून लक्षवेधी व्हिडिओ तयार करण्यासाठीच्या टीपा या विषयांवर प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन होणार आहे. कार्यशाळा पूर्ण केल्यास इंटर्नशिपच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
संपर्क : ९३५६९७३४२७

कंटेंट रायटिंग कार्यशाळा
सध्या डिजिटल माध्यमांमध्ये कंटेंट रायटर्सची भरपूर मागणी आहे. कमीतकमी शब्दांत जास्तीत जास्त आशय सांगणाऱ्या, विषयाची संपूर्ण माहिती पोचविणाऱ्या कंटेंटचे लिखाण करणे प्रत्येकालाच योग्य प्रशिक्षण मिळाल्यास शक्य आहे. एचआर, मीडिया, मार्केटिंग, मॅनेजमेंट, ॲडमिन, ग्राफिक आणि डेटाशी संबंधित अनेक फील्ड आहेत, जिथे कंटेंट रायटर्ससाठी बऱ्याच करिअर संधी उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर सदर कार्यशाळा शनिवार (ता. ६) व रविवारी (ता.७) आयोजिली आहे. यामध्ये कंटेंट रायटिंगची मूलभूत तत्त्वे, लेखनाचे तंत्र, कंटेंटचे संशोधन, योजना, लेखन, संपादन आणि ऑप्टिमाइझेशन करण्याची कौशल्ये, विशिष्ट प्रेक्षक आणि प्लॅटफॉर्मसाठी कंटेंट कसा लिहायचा, लिखाणासाठी एआयचा वापर, एसईओ आणि कंटेंट मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी वापरायची याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संपर्क : ९१४६०३८०३१

वाईल्डलाईफ फोटोग्राफी
वाईल्डलाईफमध्ये काम करत असलेली ‘नेमोफिलिस्ट’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने चालणारे वाईल्डलाईफ फोटोग्राफी प्रशिक्षण लवकरच सुरु होणार आहे. निसर्गाची व नैसर्गिक जिवांची आवड असणाऱ्या छायाचित्रकारांसाठीचा एक परिपूर्ण फोटोग्राफी कोर्स ‘नेमोफिलिस्ट’ने डिझाईन केला आहे. क्लासरूम ट्रेनिंगसह नैसर्गिक अधिवासांमध्ये हँड्स-ऑन फोटोग्राफी सत्रे प्रशिक्षणादरम्यान होणार आहेत. या प्रशिक्षणासंदर्भात मार्गदर्शन करणारा व प्रश्नोत्तररुपी विनामूल्य सेमिनार येत्या रविवारी (ता. ७) सकाळी ११ ते दुपारी १ यादरम्यान होणार आहे.
संपर्क : ८९५६३४४४७२

‘एफपीसी सीईओ’ प्रशिक्षण वर्ग
एफपीसीची नोंदणी पूर्ण होताच या कंपनीला सीईओ (किंवा व्यवस्थापक) नियुक्त करणे आवश्यक असते. भारतामध्ये आजघडीला ४० हजारांहून अधिक एफपीसींची नोंदणी झालेली आहे. या पार्श्वभूमीवर १३ जुलैपासून पाच दिवसांचे ‘एफपीसी सीईओ’ प्रशिक्षण आयोजिले आहे. शेतकरी कंपनी नोंदणी प्रक्रिया व नोंदणीनंतरचे अनुपालन, कृषी व्यवसाय मूल्यसाखळी, शेतमाल पुरवठा साखळी व्यवस्थापन, भांडवल उभारणी व वित्त व्यवस्थापन, कर प्रणाली, व्यवसाय आराखडा स्वरूप, बुक किपिंगचे महत्त्व, शासकीय योजनांची ओळख, या क्षेत्रातील रोजगार संधींची व्याप्ती याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. कृषीसह इतर शाखेतील पदवीधर, एफपीसी संचालक तसेच एफपीसी नोंदणी करू इच्छिणारे शेतकरी यांच्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.
संपर्क : ९३०७६४९०४७
वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com