वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रम

वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रम
Published on

पुणे, ता. २ : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विविध पक्ष, संस्था व संघटनांतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड आणि खान एज्युकेशन फाउंडेशनच्या यांच्यावतीने वानवडी येथे वारकऱ्यांना राजगिरा लाडू, बिस्कीट, आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी गौसिया खान, फिरोज मुल्ला, वैशाली शिंदे, अलमास खान, रुक्सार खान उपस्थित होते. नाना पेठेतील राजेवाडी तरुण मंडळ व संघर्ष ग्रुप यांच्यावतीने वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर, औषध वाटप आणि अन्नदान करण्यात आले. अशी माहिती गणेश वैरागर यांनी दिली. शहरात आलेल्या हजारो वारकऱ्यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे वाकडेवाडी येथे मोफत चरणसेवा केली. या सेवेमध्ये वारकऱ्यांच्या तुटलेल्या चप्पल, बॅग, रेनकोट, छत्री या वस्तूंची मोफत दुरुस्ती करण्यात आली. यावेळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे, संतोष टोणपे, संजय लोकापुरे, हनुमान चराटे, सूर्यकांत भोसले, जंगल गद्रे आदी उपस्थित होते. वारकऱ्यांना बालाजी घायाळ यांनी बूट व चप्पल आणि दीपक पवार यांनी लाडूंचे वाटप केले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघ गटई कामगार सेल जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत उत्तम भोसले यांनी केले होते. सिराज पूनावाला यांच्यातर्फे विश्रांतवाडी येथे पालखी स्वागताच्या वेळी वाहतूक नियोजन तसेच फळेवाटप, चहा बिस्कीट, पाणी बॉटल वाटप करण्यात आले. प्रभाग क्र १८, कृष्णहि‌टी चौक शिवसेना शाखेतर्फे वडा पाव, चहा आणि जिलेबी वाटप करण्यात आले. यावेळी कसबा विभाग प्रमुख चंदन साळुंके, कसबा संघटक संदीप गायकवाड, गायत्री गरुड, बाळासाहेब गरुड, पंकज बरीदे, सागर गंजकर, गणेश गुंजाळ, योगेश इंगुळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महिला आघाडीच्या मेघा पवार आणि कसबा विभाग संघटक रूपेश पवार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com