पेठांमध्ये सुरळीत होईना पाणी पुरवठा

पेठांमध्ये सुरळीत होईना पाणी पुरवठा

Published on

पुणे, ता. २ ः खडकवासला जॅकवेल येथे शॉर्टसर्किट झाल्याने पेठांसह पूर्व भागातील पाणी पुरवठा विस्कळित झाला होता. त्यानंतर अजूनही पेठांमधील काही भागात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गुरुवारी (ता. ४) पाणी पुरवठा असणार आहे, त्यामुळे उद्या (ता. ३) पूर्ण दाबाने पाणी पुरवठा केला जावा अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरात संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन होण्याच्या एक दिवस आधी खडकवासला जॅकवेल येथे शॉर्टसर्किट झाल्याने धरणातून होणारा पाणी पुरवठा विस्कळित झाला. महापालिकेने तातडीने उपाय योजना करून पाणी पुरवठा सुरू केला. शहरात लाखो वारकरी असतानाही गुरुवार पेठ, घोरपडे पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, गंज पेठ भागात पाणी कमी दाबाने होते. आज पालखी पुण्यातून बाहेर गेल्यानंतरही काही भागात पाण्याच्या तक्रारी होत्या.
दरम्यान, गेल्या तीन-चार दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळित होता. त्यानंतर आता गुरुवारी (ता. ४) देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी बंद असणार आहे. त्यामुळे गुरुवारनंतर पुन्हा दोन दिवस नागरिकांना अपुरे पाणी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी पेठांमध्ये जास्त वेळ व पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते ऋषिकेश बालगुडे यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.