

पुणे, ता. २ :‘‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पाणी आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती विकसित करण्याच्या क्षमतेची शिफारस केली आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळेतील ‘इको क्लब’ ही एक योजना आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता विकसित करणे, सद्यःस्थितीत पर्यावरणीय समस्या जाणून घेणे, सकारात्मक दृष्टिकोन आणि पर्यावरण संवर्धनासाठी अभिवृत्ती विकसित करणे, या उद्देशाने पर्यावरणपूरक शैक्षणिक कृतींचे आयोजन करावे,’’ असा सल्ला परभणी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विकास सलगर यांनी दिला.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने ‘इको क्लब फॉर मिशन लाइफ’ यावर आधारित ऑनलाइन सभेत सलगर बोलत होते. इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी जीवनशैली आणि शाश्वत अन्नप्रणाली स्वीकारणे, ई-कचरा कमी करणे, ऊर्जा-पाणी बचत आणि प्लास्टिकचा वापर टाळणे या संकल्पनेवर आधारित शैक्षणिक कृतींना आता राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी दिली जाणार आहे. शाळेतील पर्यावरणपूरक शैक्षणिक कृतींच्या व्यापक प्रसिद्धीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘merilife.nic.in’ हे पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलवर शाळांनी नोंदणी करून संबंधित छायाचित्रे आणि इतर डिजिटल साहित्य अपलोड करावे, असे सलगर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.