दुबईला जाणाऱ्या विमानाला साडेसात तासांचा उशीर

दुबईला जाणाऱ्या विमानाला साडेसात तासांचा उशीर

Published on

पुणे, ता. ३ ः पुण्याहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेट (एसजी- ५१) विमानाला तब्बल साडेसात तासांचा तर दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानाला पाच तासांचा उशीर झाल्याने दुबईला जाणाऱ्या विमानाला उशीर झाला. यापूर्वीदेखील अनेकदा दुबईला जाणाऱ्या विमानाला उशीर झाला होता. विमान प्रवासाला वारंवार उशीर होत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पुण्याहून दुबईला जाणाऱ्या विमानांचे मंगळवारी रात्री ८ वाजता उड्डाण होते. त्याला साडेसात तासांचा उशीर झाला. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हे विमान दुबईच्या दिशेने झेपावले. रात्रभर प्रवाशांना टर्मिनलमध्ये ताटकळत बसावे लागले. या वेळी विमान सेवा देणाऱ्या कंपनीने प्रवाशांना कोणतीही माहिती दिली नसल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण होते. महिला व लहान मुलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.

आमचे पुणे ते दुबईचे विमान रात्री आठ वाजता होते. विमानाचा ऑनलाइन स्टेटस तपासला असता उशिरा होणार असल्याचे समजले. म्हणजेच आठ वाजताचे विमान साधारण नऊ ते साडेनऊ होतील, अशी माहिती होती. मात्र विमानतळावर गेल्यानंतर समजले की, विमान दिल्लीतच असल्याने किती वेळ लागले याबद्दल व्यवस्थित माहिती देण्यात आली नाही. आम्ही पहाटे तीनपर्यंत विमानतळावरच होतो. वातावरण बदल असे यामागील कारण सांगण्यात आले. मात्र याची आधीच माहिती दिली असती तर नाहक त्रास सहन करावा लागला नसता. अनेक प्रवासी संतप्त झाले होते. एअरलाइन्सने योग्य त्या उपाययोजन करणे गरजेचे आहे.
- ॲड. योगिनी गायकवाड, प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.