महिलेचा विनयभंग
करणाऱ्याला अटक

महिलेचा विनयभंग करणाऱ्याला अटक

Published on

पुणे, ता. ४ : दुकानातील स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठी आलेल्या महिलेसोबत अश्लील कृत्य करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार मे २०२४ मध्ये लक्ष्मी रस्त्यावरील एका हिऱ्यांच्या शोरूममध्ये घडला. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
याबाबत ३८ वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खडकसिंग किर्तीसिंग बोगटी (वय ४५, रा. सहकारनगर, पूना कॉलेजसमोर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सफाई कर्मचारी आहे. लक्ष्मी रस्त्यावरील हिऱ्याच्या दुकानात त्या साफसफाईचे काम करतात. २९ मे रोजी त्या बाथरूम स्वच्छ करत होत्या. त्यावेळी आरोपी तेथे आला आणि त्याने त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करून विनयभंग केला. महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.