स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी महापालिका प्रशासन सज्ज

स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी महापालिका प्रशासन सज्ज

Published on

पुणे, ता. ५ : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत स्पर्धेत अव्वल क्रमांक गाठण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. महापालिका प्रशासनाने स्वच्छ भारत स्पर्धा सर्वेक्षणानिमित्त महापालिकेच्या कामातील सुधारणांसह शहरात अस्वच्छता पसरविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करणे, कचरा टाकली जाणारी ठिकाणे (क्रॉनिक स्पॉट) नष्ट करणे, शहर अधिकाधिक स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.

केंद्र सरकारतर्फे दरवर्षी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ भारत सर्वेक्षण स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत आतापर्यंत पुणे शहराला एकदाही अव्वल क्रमांक प्राप्त झालेला नाही. यंदा अव्वल क्रमांकासाठी महापालिका प्रशासनाने आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी गुरुवारी (ता. ४) स्वच्छ सर्वेक्षणाबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम यांच्यासह सर्व परिमंडलातील अधिकारी, सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त, घनकचरा विभागाचे अधिकारी, आरोग्य निरीक्षक आदी उपस्थित होते.

घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छतेच्या कामकाजाचे सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. तसेच त्यांच्याकडून आवश्‍यक साधनसामुग्रीची मागणी करण्यात आली. स्वच्छ भारत सर्वेक्षणात पुणे शहराची कामगिरी अधिक उंचावण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. त्यामुळे कचरा टाकला जाणारी ठिकाणे स्वच्छ करावीत, अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष द्यावे, अशा सूचना देत पृथ्वीराज बी. पी. यांनी संबंधित कामांची गांभीर्याने नोंद घेतली जाणार असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.