डिजिटल स्वाक्षरीद्वारे ट्रस्टचा बदल अहवाल मंजूर

डिजिटल स्वाक्षरीद्वारे ट्रस्टचा बदल अहवाल मंजूर

Published on

पुणे, ता. ५ : धर्मादाय कार्यालयांमधील कामकाज अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीद्वारे करण्यात यावेत, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार राज्यात पहिल्यांदाच पुणे विभागाचे धर्मादाय उपायुक्त राजेश परदेशी यांनी साधना ट्रस्टचा बदल अहवाल डिजिटल स्वाक्षरीद्वारे मंजूर केला. तसेच दत्तवाडीतील आद्य क्रांती गुरू लहूजी साळवे ट्रस्टचे नोंदणी प्रमाणपत्र सहाय्यक आयुक्त प्रशांत चव्हाण यांच्या प्रथम स्वाक्षरीने प्रदान केले.
विभागीय धर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांनी साधना ट्रस्टचे वकील ॲड. शिवराज कदम जहागीरदार यांना डिजिटल स्वाक्षरीत आदेश प्रत प्रदान केली. साळवे ट्रस्टचे अर्जदार सूर्यकांत नामदेव सकट यांना ॲड. विद्या तावरे यांच्यासह नोंदणी प्रमाणपत्र सुपूर्द केले. सहआयुक्त राहुल मामू व न्याय अधीक्षक शंकर गडाळे यावेळी उपस्थित होते.
कार्यालयीन कामकाजाच्या संगणकीकरणाचे काम डिजिटल स्वाक्षरीमुळे सुलभ होईल. आदेश प्रती व नोंदणी प्रमाणपत्रांची विश्वासार्हता वाढेल, असा विश्वास पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. शिवराज कदम-जहागीरदार यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.