‘मतदार नाव नोंदणीसाठी 
पक्षांनी सहकार्य करावे’

‘मतदार नाव नोंदणीसाठी पक्षांनी सहकार्य करावे’

पुणे, ता. ५ : मतदार यादी शुद्धीकरणासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यासमवेत (बीएलओ) राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीने (बीएलए) घरोघरी भेटी देऊन ऑनलाइन मतदार नोंदणीसाठी मदत करावी. त्यासाठी पक्षांनी बीएलएंची नेमणूक करावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी शुक्रवारी (ता. ५) केले.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत कळसकर आणि निवडणूक शाखेचे तहसीलदार राहुल सारंग यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले.
कळसकर म्हणाल्या, ‘‘मतदान केंद्र निश्चितीसाठी शक्यतो एका बूथमध्ये एक हजार ४५० मतदारांचा समावेश असेल, अशी स्वयंचलित प्रणाली उपयोगात आणली जात आहे. शहरात सध्या पंधरापेक्षा अधिक बूथ असलेली ४० ते ४५ मतदान केंद्रे असून, त्यांची सुसूत्रीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, आपल्या घराजवळ असलेल्या मतदान केंद्राऐवजी लांब जावे लागलेल्या मतदारांना सोईचे होईल, असे मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्याच्यादृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे.’’
छायाचित्र यादीतील श्वेतधवल फोटो, अस्पष्ट फोटो असलेल्या मतदारांकडून रंगीत फोटो घेण्याची प्रक्रिया करण्यात येते. तसेच, पत्ता बदल, स्थलांतरण तसेच दावे व हरकतींच्या अनुषंगाने संबंधित मतदारांना नोटीस देऊन कार्यवाही केली जाते. मतदारांनी शक्यतो आयोगाच्या https://voters.eci.gov.in या पोर्टलवरुन किंवा Voter Helpline वरून मतदार नोंदणी, पत्ताबदल आदींचे अर्ज ६, अर्ज ७ तसेच ८ भरल्यास संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना त्यावर गतीने कार्यवाही करता येते. मतदार यादीतील नाव वगळण्यात आलेल्यांची यादी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे कळसकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com