आर्थिक मदतीतून महिलांना ‘मनोधैर्य’

आर्थिक मदतीतून महिलांना ‘मनोधैर्य’
Published on

पुणे, ता. ३० : अत्याचार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ल्यातील महिला आणि मुलींचे आर्थिक मदतीतून ‘मनोधैर्य’ वाढविण्यात येत आहे. २०१८ ते सप्टेंबर २०२४ दरम्यान एक हजार ३१५ अर्जांपैकी ८६४ पेक्षा अधिक महिलांना तीन कोटी ८३ लाख ८९ हजार ५०० रुपयांच्या रकमेचे वाटप ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा’च्या माध्यमातून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे २०१८ पासून ही मनोधैर्य योजना राबविण्यात येत आहे. विविध प्रकारचे अत्याचार झालेल्या मुली आणि महिलांना या योजनेच्या माध्यमातून अर्थसाहाय्य करण्यात येते. २०१९ मध्ये ॲसिड हल्ल्यातील १७ वर्षाच्या मुलीला या योजनेमधून एकूण दहा लाख रुपये मिळाले असून, ती मुलगी आपले आयुष्य समाधानाने जगत आहे. तर २०२२ मध्ये एका अडीच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. त्यात मुलीचा मृत्यू झाला होता. त्या मुलीच्या कुटुंबीयांना मनोधैर्य योजनेमार्फत एकूण दहा लाख रुपयांची मदत करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा विधी प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली.

असा मिळतो योजनेचा लाभ...
मनोधैर्य योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर ती व्यक्ती महाराष्ट्रातील रहिवासी असावी. तिच्याबाबत काही गुन्हा घडला असेल, तर त्याबाबतची तक्रार, एफआयआर, ओळखपत्र, आवश्यकतेनुसार वैद्यकीय अहवाल, न्यायालयात दिलेला जबाब, अत्याचारात मृत्यू झाला असेल, तर त्याचे प्रमाणपत्र ही सर्व कागदपत्रे जिल्हा न्यायालयात असलेल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात सादर करावी लागतात.

मनोधैर्य योजनेंतर्गत कमीतकमी ३० हजार रुपयांपासून ते १० लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येते. अत्याचार झालेल्या मुलीला किंवा महिलेला पुन्हा त्याच प्रकारच्या शोषणाला बळी पडावे लागू नये, यासाठी त्यांना तातडीने आधार आणि धैर्य देण्याची गरज असते. नुकसान भरपाई आणि त्यासंबंधित इतर मदतीमुळे त्या महिलांमध्ये जगण्याची नवीन उमेद मिळते.
सोनल पाटील, सचिव, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

‘मनोधैर्ये’नुसार वाटप करण्यात आलेली रक्कम...
वर्ष रक्कम
२०१८-१९ १५ ,९०, ०००
२०१९-२० ३३, २५, ०००
२०२० -२१ २३, ८००००
२०२१ -२२ ६३, २५, ०००
२०२२-२३ ६६, ५००००
२०२३-२४ १, ७८, १९, ५००
सप्टेंबर २०२४ ३,००, ०००
एकूण ३, ८३, ८९, ५००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com