ॲटेनेक्स स्पोर्ट्सतर्फे मॅरेथॉन स्पर्धा

ॲटेनेक्स स्पोर्ट्सतर्फे मॅरेथॉन स्पर्धा

Published on

पुणे, ता. ७ ः स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ॲटेनेक्स स्पोर्ट्सने ‘ॲटेनेक्स इंडिपेन्डेन्स डे रन २.०’ ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. गुरुवारी (ता. १५ ऑगस्ट) पहाटे साडेपाचला पुण्यातील पंडित फार्म येथून मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. ३, ५ आणि १० किलोमीटर अशा तीन गटांत ही स्पर्धा होणार आहे. ३ किलोमीटरचा गट हा लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. ५ किलोमीटर फन रन तर १० किलोमीटर टाइम्ड रन असणार आहे.
या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक सकाळ माध्यम समूह आहे. ॲटेनेक्स स्पोर्ट्सने आयोजित केलेले स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. मागच्या वर्षी या स्पर्धेत सुमारे ५०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यंदाच्या वर्षी २ हजार स्पर्धक सहभागी होतील अशी शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे.

स्पर्धेचा मार्ग
३ किलोमीटर : पंडित फार्म - म्हात्रे पूल- पंडित फार्म.
५ किलोमीटर : पंडित फार्म - दशभुजा गणपती - पंडित फार्म.
१० किलोमीटर : पंडित फार्म - दशभुजा गणपती- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- लकडी पूल, डेक्कन चौक- नळ स्टॉप- म्हात्रे पूल- पंडित फार्म.

नोंदणी व शुल्क
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. ही नोंदणी ‘टाऊनस्क्रिप्ट’वर करता येईल. १० किलोमीटर :१, २९९ रुपये, ५ किलोमीटर ८९९ रुपये व ३ किलोमीटरसाठी ५९९ रुपये असे शुल्क आकारण्यात आले आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला पंडित फार्म येथे सर्व स्पर्धकांसाठी ‘वॉर्म-अप ॲक्टिव्हिटी’ होईल. स्पर्धा पार पडल्यावर सर्व स्पर्धकांना पंडित फार्म येथेच नाश्त्याची सोय केली आहे. सर्व स्पर्धकांना बिब आणि टी-शर्ट दिले जातील. विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.