न्यू इंग्लिश रमणबाग शाळेत 
शिवराज्याभिषेक दिन साजरा

न्यू इंग्लिश रमणबाग शाळेत शिवराज्याभिषेक दिन साजरा

Published on

पुणे, ता. ७ : न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेत शनिवारी ‘शिवराज्याभिषेक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी शिवाजी महाराज यांचा पोवाडा, शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, संबळ वादन असे विविध शिवकालीन कलाप्रकार सादर करण्यात आले.
या वेळी मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई, उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजूषा शेलूकर, प्रमोद वसगडेकर, राहुल पुंडे, आश्विन देवळाणकर आदी उपस्थित होते.
तनय नाझीरकर व अमोघ कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीचे गायन केले. शिवव्याख्याते प्रसाद मोरे यांनी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यामागची भूमिका आणि उद्देश याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच, शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या प्रसंगांचे कथन केले. श्रीपाद लुल्ला व त्याच्या साथीदारांनी संबळ वादन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. तसेच, शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करण्यात आली. प्रास्ताविक चारुता प्रभुदेसाई, तर अर्चना देवळाणकर यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत पाठक यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.